करियर ऑप्शन होममेकर
होममेकर म्हणजे पूर्ण वेळ घर सांभाळणे . खरे तर घराचे घरपण आणि कुटुंब व्यवस्था जिवंत ठेवणे . बरेचदा हि जबाबदारी स्त्रीयांवर येते आणि स्त्री पूर्णपणे दुर्लक्षिली जाते . तिचे ते घर आणि मुले सांभाळणे खूप गरजेचे असुनही कमी लेखले जाते. काहीश्या नाराजीनेच स्विकारलेली आणि काही करता आले नाही म्हणून गृहिणी झालेली स्त्री अशी तिची ओळख होते. बरेचदा टोमणे ऐकून स्त्रियांच्या मनात न्युनगंड तयार होतो. म्हणुनच खरेतर होममेकर हेच करियर ऑप्शन म्हणुन का निवडू नये? असा विचार अजून तरी कोणीही केलेला नाही.
हे वाचुन बरेच जणांनी भुवया उंचावल्या असतील.
डॉक्टर ,इंजिनीअर ,टीचर,दॅन व्हाय नॉट होममेकर ???
खरे तर आज सुशिक्षित होममेकर ची requirement जास्त आहे पण असे ऑप्शन निवडणारे कोणीही नाही.
स्वतः सोबत घरातील सर्वांना विकसित करणे वाटते तेवढे सोपे नाही. मी आणि माझे करियर इतकाच विचार करणारी कोणीही व्यक्ती हे करू शकत नाही.
घर सांभाळून काम करणारी सुद्धा बरीच जण आहेत हे खरे पण सगळ्यांनाच ते शक्य नसते. पुर्वी एकत्र कुटुंब होती घरात आज्जी आजोबा, काका काकू असे घर भरलेले असायचे. लहान मुलांनवर आपोआप संस्कार व्हायचे. त्यामुळे कुटुंबाचा प्रमुख घटक असलेली मुले सुरक्षित हातात आहेत हे ठाऊक असायचे, पण आज घरातुन बाहेर पडणाऱ्या पालकांना काळजी असते, आपले मुलं सुरक्षित असेलच अशी खात्री नाही. मुलांना वेळ देता न येण्याची खंत भरून काढण्यासाठी मग अनावश्यक लाड पुरवले जाऊ लागतात मुलांनाही मग मोबाईल्स ,व्हिडीओ गेम , टी. व्ही. अशी प्रलोभने दिली जातात आणि मग मुलंही त्याच्या अधीन होऊ लागतात.
कालांतराने आई बाबांपेक्षाही मुलांना मिळणारे हे स्वातंत्र्य आणि ह्या वस्तू जास्त प्रिय होतात.
पालक म्हणून आर्थिक गरजा भागवल्याचे समाधान असले तरी काही विपरीत गोष्टी नंतर सामोऱ्या होतात.
पाल्य चिडचिडा झालाय, नर्व्हस वाटतो आहे, डिप्रेशन मध्ये जातोय असा शाळेतुन निरोप आल्यावर ह्या सगळ्याचा विचार सुरु होतो. मुलांबरोबरच पालकांनाही मग फ्रस्टेशन यायला लागते. मुलांना ह्यातून कसे बाहेर काढावे? नेमके आपले काय चुकले? हे सांगायला घरातील हक्काचा समुपदेशक पाल्य व पालक दोघांनाही गरजेचा असतो. इथेच हा होममेकर खूप महत्वाचा आहे ह्याची जाणीव होते. त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबात आणि वर्किंग पालक असतील तर अश्या कुटुंबातील मुले गुन्हेगारी कडे वळतात अथवा निराशेने आत्महत्येचा मार्ग अवलंबू शकतात. पैशा बरोबरच वेळ देणे सुद्धा गरजेचे आहे. घरी थांबुन मुलांना घडवणारी आई किंवा बाबा असलेल्या कुटुंबा मध्ये मुलं सुरक्षित फील करते हे सिद्ध झाले आहे. म्हुणुनच होममेकर हे ऑप्शन पैसे मिळवून देत नसले तरी कुटुंब आणि मुलं सुरक्षित आणि निरोगी ठेवते. पण मग होममेकर कोण?? आई वडील दोघांपैकी कोणीही स्वतः होऊन योग्य वेळी घरी रहाण्याचा निर्णय घेऊच शकतो ज्याला सहज शक्य आहे त्याने ईगो बाजूला ठेवून होममेकर झाल्यास भारतीय कुटुंब व्यवस्था जी आज ढासळू लागलेली आहे ती सावरली जाईल हे निश्चित.
आश्वासक पाल्य आणि निरोगी सुदृढ कुटुंब ही भारताचे भविष्य आहेत. केवळ करियर करूनच पैसे आणि समाधान व यश मिळतेच असे नाही. त्याग हा सुद्धा भारतीयांचा एक गुण आहे. लोकांच्या नजरेत काहीही न करणारी होममेकर च खऱ्या अर्थाने कुटुंब आणि देश घडवताहेत.


हाय
माझा हा ब्लॉग आवडला असेल तर like करा आणि शेअर करा 🙏🏻🙏🏻
Thank you
Kup cham
धन्यवाद
Kup chan
खूप सुंदर
Housewife should get respect.
खरं आहे
खूप सुंदर, सत्य परिस्थिती मांडली आहे