Uncategorized

“दुबई ” सोनेरी संस्काराचे कोंदण

दुबई ट्रिप करून आम्ही परतलो आणि पुढच्या आठवडाभरात युद्धाची ठिणगी पडली. यात सुरक्षित आणि समृद्ध अशा दुबई वर हल्ला झाला या बातमीमुळे आम्ही सुखरूप घरी आलो ना?? असे जवळच्या सगळ्यांनीच विचारले. बातमी ऐकताच आपण खरोखरच सुखरूप आलो ही देवाची कृपा आहे हे जाणवले. भारत सरकारच्या आणि दुबई सरकारच्या यशस्वी प्रयत्नांमुळे तिथे असलेले सर्व पर्यटक सुरक्षित परतले हे जरी खरे असले तरी काही काळासाठी तरी बंद...

Continue reading...

हिंदूत्व आणि क्रांती

ट्रॅफिक मुळे ऑफिस मधून घरी यायला उशीर झालेली मंदिरा तणतणतच घरात आली. आज्जी वाटच पाहत होती, मंदिरा आवरुन येईपर्यंत आज्जीने अन्न गरम करून जेवायला वाढले. तितक्यात मंदिराचा फोन वाजला, ” ए बाबा आधी ते मंदिरा म्हणणं बंद कर बरका call me Maddy!! मंदिरा फार ओल्ड फॅशन and so बोअरिंग आहे. आता बोल …होना रे बांगलादेशातील हिंदू लोकांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात निदर्शनं सुरू आहे म्हणून उशीर...

Continue reading...

असला नवरा नको गं बाई…..

आज घरी मीताच्या शाळेतील मैत्रिणींची भिशी होती. सगळ्या चाळीशीच्या आणि एकाच गावात सासर -माहेर असल्यामुळे महिन्यातून एकदा भिशी करता आवर्जून भेटणं व्हायचं. भरपूर वेळ एकत्र घालवता यावा म्हणून घरीच भिशी करायची आणि पार्सल मागवायचे हा नियम होता. मीताच्या सासुबाई आज जवळच राहणाऱ्या त्यांच्या मावस बहिणीकडे जाणार होत्या, तसं मीताने त्यांना काही म्हणलं नव्हतं पण त्या स्वतःहून जाते म्हणल्या पण ती गावाला गेल्याचं समजलं आणि त्यांना...

Continue reading...

गाभारा

भाग २ न थांबणारा पाऊस आणि ऋतुजाला होणारा उशीर सासुबाईंची चिंता वाढवत होता. इकडे ऋषभ ऋतुजा दोघंही चांगलेच भिजले आणि घाबरले होते. पावसामुळे दोघांचेही फोन डिस्चार्ज झाले होते. घरी कसं जाणार? कसं कळवणार हे समजत नव्हतं. ऋतुजाला आपल्या भजी खाण्याच्या हट्टाचा राग येत होता. आपण त्यांचं ऐकायला हवं होतं असं तीला राहून राहून वाटत होतं. आडोसा असला तरी थंडी वाजत होती आणि डोकं सोडून सगळं...

Continue reading...

गाभारा

भाग १ कॉम्प्युटर इंजिनियर असलेला ऋषभ अगदी देवभोळा नसला तरी नास्तिक सुद्धा नव्हता. फार देव देव करायला त्याला तितका वेळ आणि आवड दोन्ही नव्हते पण देवघरातल्या देवाला सकाळी आणि संध्याकाळी न चुकता नमस्कार करण्याची आईने लावलेली सवय मात्र जपली होती. आवर्जून नाही पण सवयीने का होईना मंदिरात गेलाच तर चपला न विसरता काढून ठेवायचा. आई म्हणायची गाभाऱ्याचं पावित्र्य राखलं पाहिजे. त्या वेळी त्याचा अर्थ फारसा...

Continue reading...

आय लव्ह माय इंडिया

“माझं माझ्या देशावर प्रेम आहे. ” सुजलाम सुफलाम … असा आपला भारत देश. दुसऱ्या देशात राहून आलेल्या माणसाला आपला देश सुंदर वाटतोच पण आपल्या देशात राहणारा माणूस देशावर खरं प्रेम करतो का?? हे प्रेम करण्याइतका वेळ त्याच्याकडे आहे का?? असा प्रश्न विरेन ला पडला होता. दोन दिवसांपूर्वी त्याचा मित्र अमेरिकेहून स्वदेशी परतला होता. त्याला भेटल्या पासून विरेन जास्त अस्वस्थ झाला होता. अमेरिका काय आणि इंग्लंड...

Continue reading...

Just a Mother

Omi is 14 years old and now he is in 8th standard. Today there is a function in Omi’s school. It’s a first day of new year. Students will introduce there parents. Now it’s Omis turn to introduce his mother and father. His father is a business man and mother is a house wife. Omi went on stage and tell about his father, after that...

Continue reading...

अर्थ

“प्रेम म्हणजे मुर्तीमंत सौंदर्य असतं, देवाच्या सुंदर मुर्तीच्या सुंदर पावलांवरच्या पवित्र फुलासारखं असतं प्रेम, पुरुषांच्या आश्वासक नजरेत दिसतं, स्पर्शाची गरजही शब्दांत भरून निघते तिथे प्रेम असतं, काळ्याभोर केसांमध्ये माळलेल गजऱ्याच्या मोहक वासात प्रेम असतं, हंबरडा फोडून गाईला ढुशी देणाऱ्या वासराला सुद्धा जे कळतं ते प्रेम असतं. शिवाच्या पिंडीवर व्हायलेल्या बिल्वपत्रावरच्या पांढऱ्या फुला इतकं निर्मळ असतं प्रेम …..”. मंगेश पाडगावकरांची प्रेम म्हणजे प्रेम असतं ही कविता...

Continue reading...

टीव्ही संस्कृती

कल्पनाच्या घरी आज मैत्रिणींचे Get-together ठरलं होतं, निमित्त अर्थातच Women’s Day च होतं. शाळेच्या दहा जणींचा गृप होता पण प्रत्यक्षात पाच जणीच भेटू शकल्या होत्या तेही सोशल मीडिया मुळे. कारण नव्वदची बॅच म्हणजे नो मोबाईल आणि साधा फोन सुद्धा अगदी एखादी कडे होता त्यातही घरं बदलेली, लग्न झालेले, नाव-गाव सगळच बदललं त्यामुळे संपर्क साधावा तरी कसा?? तरी त्यातल्या त्यात आता फेसबुक मुळे आणि जुन्या नावाचा...

Continue reading...

परिपक्वता

वसुधा चे लग्न तिच्या वयाच्या बावीसाव्या वर्षी झाले, त्या वेळी तिच्या सासुबाई पन्नासच्या आसपास असाव्यात. आता तिच्या लग्नाला पंचवीस वर्षे उलटून गेली होती, ती आता पन्नाशीला आणि सासुबाई पंच्याहत्तरीला आल्या होत्या. तीच्या लग्नाच्या वेळी असलेला त्यांचा ताठरपणा आणि तिचा अल्लडपणा सुद्धा गेल्या काही वर्षांत गळून पडला होता. तश्या त्या टिपिकल सासूपणा करणाऱ्या नव्हत्या. तरीही सासू या नात्यात ओघाने येणारी आढी मात्र आवर्जून मोडावी इतक्या त्या...

Continue reading...