कल्पनाच्या घरी आज मैत्रिणींचे Get-together ठरलं होतं, निमित्त अर्थातच Women’s Day च होतं. शाळेच्या दहा जणींचा गृप होता पण प्रत्यक्षात पाच जणीच भेटू शकल्या होत्या तेही सोशल मीडिया मुळे. कारण नव्वदची बॅच म्हणजे नो मोबाईल आणि साधा फोन सुद्धा अगदी एखादी कडे होता त्यातही घरं बदलेली, लग्न झालेले, नाव-गाव सगळच बदललं त्यामुळे संपर्क साधावा तरी कसा?? तरी त्यातल्या त्यात आता फेसबुक मुळे आणि जुन्या नावाचा संदर्भ सापडल्याने या पाच जणी तरी भेटल्या ही मोठी गोष्ट. आजची ही भेट इतक्या वर्षांनी प्रथमच आणि म्हणूनच उत्साहाला उधाण आले होते. सगळ्या जणी पन्नाशीला आलेल्या त्यामुळे जरा सैलावलेल्या आणि स्थुलावलेल्याही होत्या. एकदोन जणींना तर नातवंडे होती. कल्पनाला स्वतःला एक नात होती, आठ वर्षांची. आजच्या पिढीला शोभेल अशीच वयाच्या मानाने mature आणि गुणी. आज्जीचा मैत्रिणींच्या बरोबर party 🥳 करण्याचा plan ठरतोय हे त्या चाणाक्ष मुलीने केंव्हाच जाणले होते. मी सुद्धा इथेच तुझ्यासोबत घरी थांबणार आहे हे तिने आधीच आज्जी कडून कबूल करुन घेतले होते, म्हणूनच सगळ्या मंडळींना बाहेर पाठवून देण्यात यशस्वी झालेल्या आज्जीला लाडक्या नाती समोर शरणागती पत्करावी लागली होती. मी माझ्या रूममध्ये खेळेन, I will not be disturbing you granny, don’t worry. असं स्वतःहून मान्य करून ती पार्टी मध्ये entry करू शकली होती. पार्टी दिवसभर होती. बाराच्या दरम्यान सगळ्याजणी आल्या current location मुळे पत्ता शोधावा लागला नाही. सुरवातीला मन भरून गाठीभेटी झाल्या. तुझं काय, माझं काय? वैगरे माहितीची देवाण घेवाण झाली. खूप वर्षांनी होणाऱ्या प्रथम भेटीचा उत्साह ओसरल्यावर दंगा, मस्ती आणि धमाल सुरू झाली. Mocktails, Snacks आणि बरंच काही खाणं आणि मोबाईल वर आपल्या काळातली गाणी लावून नाचणं, मनमोकळं गाणं आणि त्या बरोबरच त्या वेळच्या आठवणी असं सगळं झाल्यावर जेवण करून सगळ्या जणी जरा रेंगाळल्या. एक एक जण हळूहळू आडवे पडायला लागल्या. जमीनीवर लोळत पडले तरी गप्पांचा ओघ स्वाभाविकच अखंड सुरू होता. हळूहळू विषय आपण कसे दुरावलो, संपर्क कसा तुटत गेला आणि आता कशा भेटलो यात सोशल मीडियाचा उपयोग कसा झाला यावर आला. चर्चेच्या ओघात आताची ही पिढी या सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे, आमचा मुलगा, मुलगी,नात कसे दिवसभर त्यातच डोकं खुपसून बसतात आणि हे सगळं किती भयंकर आहे वैगेरे वैगेरे. Office ची कामं सुद्धा त्यावरच आणि corona मुळे तर online class हे एक नवं फॅड वाढत आहे. ही आणि अशी बरीच चर्चा सुरू होती. मध्येच चहाचा break झाला. कल्पना चहा घेऊन आली आणि म्हणाली ,” मला काय वाटतं माहीत आहे का? की आपली टि.व्ही. संस्कृती होती आणि आता मोबाईल संस्कृती आहे.” “आं! म्हणजे काय म्हणायचं आहे तुला, संस्कृती??” विषयाला मिळालेली कलाटणी ऐकून आज्जीच्या गप्पांकडे लक्ष ठेवून असणारी नात रेवा जरा सावरून नीट कान देवून ऐकू लागली. सुषमाचा प्रश्न ऐकून कल्पना पुढे बोलू लागली, ” अगं म्हणजे असं बघ आपल्या लहानपणी म्हणजे अगदी आपण पहीली दुसरीत होतो तेंव्हा आपल्या घरात आणि बहुतेकांकडे सकाळपासून रेडिओ सुरू असायचा. वेळ समजण्यासाठी घड्याळ बघावं लागायचं नाही. कामं करता करता ऐकता येत असे. मग हळूच एक दिवस वाड्यात किंवा सोसायटीत एखाद्या घरात टीव्ही आला. हां त्या वेळी त्याच्या वेळा ठरलेल्या होत्या हे खरं असलं तरी कामं थांबवून किंवा कामं संपवून एका ठिकाणी बसून तो बघावा लागतो म्हणून घरात टीव्ही घेणं कसं चुकीचे आहे यावर चर्चा झाल्या. मग काही चांगल्या कार्यक्रमांमुळे टीव्ही घेणं अगदीच चुकीचे नाही हे पटलं आणि तो घरातला एक सदस्य झाला. सगळ्यांची वेळापत्रकं टीव्ही च्या नुसार बनवली गेली. घरातला सदस्य जीवनाचा भाग कधी झाला हे लक्षात सुद्धा आलं नाही. काही काळानंतर अनेक चॅनल सुरू झाले. ठराविक वेळेचं बंधन झुगारून दिवसभर टीव्ही त्यातल्या मालिका, बातम्या, चित्रपट आणि बरंच काही. ते सुद्धा काही जणांना खटकलच की पण कोरोना काळातलं टीव्हीचं योगदान मोलाचे ठरले. माणसाचा एकटेपणा दूर तर केलाच पण मनोरंजन करण्याचं आणि मनोबल वाढवण्याचं मोठं काम केलं आणि म्हणूनच टीव्ही संस्कृती म्हणून घेण्याचा मान मिळवला. आता काळापरत्वे मोबाईल फोन आला आणि तो त्या मानाने लवकर जवळचा झाला कारण टीव्ही च्या मानाने तो जास्त personal होता. लांब गेलेली माणसं जवळ आणण्याची ताकद मोबाईल मध्ये आहे, आपण पण या सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटलोय आणि उरलेल्या पाचही जणींना शोधू हा आत्मविश्वास या फोन मुळेच आलाय हे विसरून चालणार नाही. हां आता निबंधाचे विषय बदलतील एवढंच.” हसत हसत कल्पना म्हणाली. ” काय?? म्हणजे काय निबंध ते काय म्हणालीस?” न राहवून कल्पनाची नात बाहेर येत विचारू लागली. ” एकतर ते निबंध आहे निंबध नाही आणि तू बाहेर येऊन रूल मोडला आहेस. निबंध means essay. ” “अगं ही इतका वेळ आत होती??” शुभदा आश्चर्याने म्हणाली. मग तीला ओढून मांडीवर बसवून शिक्षिका असलेली शुभदा तीला सांगू लागली, ” रेवा! तुम्हाला तुमच्या मिस essay writing करायला सांगतात ना तसं आम्हाला आमच्या बाई म्हणजे madam सांगायच्या आणि टीव्ही शाप की वरदान म्हणजे Is TV boon or curse तसं आता टीव्ही ऐवजी मोबाईल असेल.” तशी रेवा लहान होती पण तिला साधारण काय म्हणायचं आहे ते समजले. ” Ohhh! Wow…!! Actually it’s interesting, I will tell my Miss about it and I will tell to my mom and papa that my granny’s friends are very nice and very clever. Actually my friend Nikki told me that these granny’s friends are so boring, you can come to my home n we will enjoy.” इतक्या वेळ रूममध्ये शांत बसलेल्या रेवाला किती बोलू असं झालं होतं.
“It’s very good experience I had today. I got to know a new word… something Sanskriti and many more exciting things.”
रेवा उत्साहात बडबडत आत पळाली सुद्धा आणि टीव्ही संस्कृतीवर मनापासून प्रेम करणाऱ्या मैत्रिणी मनमोकळ्या हसत आणि पुढच्या भेटीचं promise घेत निरोप घेऊ लागल्या.

