मनात माझ्या

    आता माझ्या या ब्लॉग चे वाचक कमी झाले आहेत. म्हणजे आधी खूप होते असं काही नाही. पण आता अगदीच २० च्या आत आलेत. का ते माहीत नाही पण जिथे जिथे छान प्रतिसाद मिळत होता त्या प्रत्येक ठिकाणी काही ना काही तरी कारणाने माझ्या लिखाणाचा उत्साह कमी होईल असे घडते आहे. काही सदरं बंद झाली, काही मासिकात छापून येत होते ती मासिकं बंद पडली, काही ब्लॉग नी माझे लेखन ब्लॉक केले. हे आणि असंच काहीतरी सतत होत आहे. काही जणांनी आवर्जून विचारले,” हल्ली लिहीत नाही का? आम्ही वाचतो पण प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देत नाही. छान लिहीता …” वैगेरे वैगेरे.  लेखन करण्यासाठी प्रतिसाद, प्रतिक्रिया मिळत राहाणं हे किती आवश्यक आहे हे जाणवते.                      लिहीणं आणि वाचन हे जरी छंद असले तरी ते एकांगी नाहीत. साद-प्रतिसाद फार महत्वाचा आहे.  आपली मतं, विचार मनमोकळेपणाने मांडता येतात. विचार पटणाऱ्या मंडळींबरोबर समविचारी मैत्री होते. विचारांची देवाणघेवाण होते. नवीन विषय, माहिती मिळते.                  समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे रोज काहीतरी लिहीत राहावे, वाचत जावे.  नवीन युगात  लेखन- वाचन महत्त्वाचे मग ते पुस्तकात, वहीत असो  किंवा मोबाईल फोनवर अथवा कम्प्युटरवर असो. ते करणं गरजेचं आहे.  माझ्या ब्लॉग चे ब्रीद वाक्य, “मनाचिये घावावरी मनाची फुंकर”  या उक्ती नुसार , कोणी वाचणार नाही म्हणून निराश होऊन लिहिणं बंद करणं हे अयोग्य आहे. निराश आणि मरगळलेल्या मनास नवीन ऊर्जा दिली जायला हवी म्हणूनच मन मोकळे करण्यासाठी हा लेखनप्रपंच . सहानुभूती मिळवण्याचा उद्देश नाही. 

           

                         सौ.मंजिरी जानोरकर.