देव देव म्हणती ज्याला
भाव तेथे देव, दुजा नसे ठाव.।।धृ।।
प्रसन्न मनाच्या अंतरी
वसे गाभाऱ्यात
सुख दुःखाची वाट जरी तरी
श्रद्धा असे उरात,
तरेल पैलतीर तोही,
मुखी ज्यांच्या नाव ।।१।।
निर्गुण निराकार जरी,
वर्णन त्याचे फार,
जो तो वाहतो आपुल्या,
मनानेच भार।।२।।
पिसाहून हलका कधी,
तर जडं भार फार .
कर कटावरी अन् उभा विटेवर
कुणा भेटे मंदिरात,
कुणा अंतरात।।३
देव देव नसतो, उपास तापास
नाम फुकाचे घ्यावे,
खावे दोन घास.
अंतरीचा राम पावतो,
घेता त्यांचे नाव, भाव तेथेची देव||

