स्पर्धा आणि विकास

      ” ससा कापूस जसा त्याने कासवाची पैज लाविली. ” माणुस हा समाज प्रिय प्राणी आहे असे विधान आपण नेहेमी ऐकत असतो. मुळात बुद्धी असणे ही गोष्ट त्याला इतर प्राण्यांपासून वेगळे ठरवते. दुष्ट माणूस हा जन्माला आल्यापासुन दुष्ट असत नाही. दुःख, आंनद, हेवा, ह्या भावना, समज आल्या नंतर निर्माण होतात. लहान मूल हे जास्त संवेदनशील असते. स्पर्धा करायला पालक, शिक्षक शिकवतात. स्पर्धा गैर नसतेच पण निकोप आणि संवेदनांचे भान ठेऊन स्पर्धा करणे महत्वाचे आहे ते शिकवले गेले पाहिजे. कुठे, कोणाशी आणि का?? स्पर्धा करायची हे सुद्धा समजवले जाणे आवश्यक असते.
       प्रत्येक गोष्टी करता आणि सगळीकडेच स्पर्धा करणे योग्य नसले तरी अगदी मोठी माणसे सुद्धा अशी अनावश्यक आणि अवाजवी स्पर्धा करताना दिसतो. अश्या मुळेच नाते संबंध, मैत्री, सहकारी ह्यांच्यात दुरावा अथवा कडवटपणा येतो. अति स्पर्धेच्या भावनेने टोकाची पावले उचलली जातात मने दुखावली जातात.एकमेकांशी आर्थिक बरोबरी, कार्यालयातील प्रगती ह्या गोष्टी काही प्रमाणात राहिल्या तर ठीक नाहीतर विनाकारण दुजाभाव वाढतो. एखादी गोष्ट दुसऱ्या सारखीच आपल्याला मिळावी असे वाटणे आणि तीच गोष्ट मला मिळावी असे वाटणे ह्यातला फरक समजायला हवाच. ह्यातूनच मला नाही तर तुलाही मिळू न देण्याची वृत्ती नकळत पणे वाढते. ह्यातूनच गुन्हेगारीची पावले पडतात. म्हणूनच हि मानसिक बांधणी लहान पणापसून बांधली गेली पाहिजे. इतरांच्या आनंदात आपण सुद्धा आनंद मिळवला पाहिजे दुसऱ्याचे दुःख समजून घेऊन त्याला मदत केली पाहिजे, हे सांगायला आज दुर्दैवाने तज्ञाची गरज पडते आहे. खरेतर हे बाळकडु घरातुनच मिळायला हवेत.
         मार्क्स चांगले मिळवण्याची स्पर्धा, खेळांची स्पर्धा, सौन्दर्य स्पर्धा, सौष्ठव स्पर्धा ह्या सर्वांगीण विकास घडवणाऱ्या स्पर्धांचे स्वागतच आहे. ईर्षा आणि स्पर्धा ह्यांमधील अंतर धूसर असले तरी ते स्पष्टपणे समजून घेता आले पाहिजे. म्हणजे वाढत्या वया बरोबरच आज आवश्यक असलेली जबाबदारीची जाणीव आणि समज हि दोन्ही पोषक मूल्ये समाजचा विकास करणारी ठरतील.
                                सौ.मंजिरी जानोरकर