खंत
सरणावरती मरणाची होळी
पेटली होती.
इथे मात्र जिवंत रक्तही
गोठली होती.
उघड्या डोळ्यांनी पेटलेला
वणवा पाहत होती.
जे जात होते, ते त्यांचे नव्हते,
इतकीच भावना मनात होती.
भेदरल्या नयनांनी शहरल्या तनाने
ती मात्र निमूट होती.
माझीच का ही मुले?
मीच का ह्यांची माता?
हा एकच प्रश्न ती स्वतःला
विचारत होती.
उत्तर मात्र मिळत नव्हते,
एक एक साखळी
फिरून तिच्याच भोवती
पुन्हा पडत होती.
स्वातंत्र्य मिळवलेली भारत माता
पुन्हा एकदा गुंतत होती,
पुन्हा एकदा गुंतत होती.
सरणावरती मरणाची होळी
पेटली होती.
इथे मात्र जिवंत रक्तही
गोठली होती.
उघड्या डोळ्यांनी पेटलेला
वणवा पाहत होती.
जे जात होते, ते त्यांचे नव्हते,
इतकीच भावना मनात होती.
भेदरल्या नयनांनी शहरल्या तनाने
ती मात्र निमूट होती.
माझीच का ही मुले?
मीच का ह्यांची माता?
हा एकच प्रश्न ती स्वतःला
विचारत होती.
उत्तर मात्र मिळत नव्हते,
एक एक साखळी
फिरून तिच्याच भोवती
पुन्हा पडत होती.
स्वातंत्र्य मिळवलेली भारत माता
पुन्हा एकदा गुंतत होती,
पुन्हा एकदा गुंतत होती.

