“पराधीन आहे जगती…”

             “पराधीन आहे जगती

                         पुत्र मानवाचा….”

      श्री हरी विष्णूं युगानुयुगे मानवी रूपांत अवनीवरती अवतरीत होत असतात. मनुष्य रूप धारण केल्यानंतर माणूस बनुन राहाणं हे तितकेसे सोपे नाही हे त्या विधात्याने सुद्धा कदाचित मान्य केले असेल. स्वतःच स्वतःच्या नियमांचे पालन करून प्रत्येक रूपांत एक आदर्श  देवांनी सामान्य लोकांसाठी ठेवलेला आहे.  लोककल्याणासाठी, अत्याचारी सत्ताधारी संपवण्यासाठी तर कधी पृथ्वी चे संरक्षण आणि सृष्टीच्या पुनः निर्मिती करता देवदिकांनी अवतार घेतले आहेत.

         परमेश्वराने पृथ्वीवर आल्यानंतरही जन्म-मृत्यू, प्रारब्ध, नातेसंबंध ह्या सगळ्यांमध्ये हस्तक्षेप केला नाही. उलट सर्व सामान्य माणसांप्रमाणे आपणही भोगावे लागलेले भोग भोगले आहेत, हेच पुराणांमधून सिद्ध झालं आहे. सर्व सामान्य व्यक्तींसारखा जन्म घेतला, योग्य वयात गूरू गृहीं राहून शिक्षण घेतले, राम अवतारात तर वनवासही सोसला. कोणताही चमत्कार स्वतःचे कष्ट किंवा भोग कमी करण्यासाठी केला नाही.  Shortcut वापरला नाही. हाच एक मोठा आदर्श आहे. जे देवांनी सुद्धा टाळण्याचा अथवा लवकरात लवकर एखादि गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न केला नाही आणि तसे कोणी केले तरी ते कसे अयोग्य आहे, हे कृतीतून मानवी मनावर ठसवले.  

        विज्ञान-तंत्रज्ञान हे विकसित झालेच पाहिजे पण नियमांचे पालन करून. प्रगती ही विधेयक असायला हवी विध्वंसक नाही. अन्यथा परिणाम भयानक होतात हे अनेकदा सिद्ध झाले आहे. 

      काही गोष्टी अनाकलनीय आहेत त्यांचा विनम्रपणे स्विकार व्हायला हवा.  आजही बऱ्याच बाबतीत आपले पराधिनत्व मान्य करायला हवे. हे समजणे म्हणजेही प्रगल्भ असणे आहे.

     

पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा.

                                  सौ.मंजिरी जानोरकर.