“जीवन गाणे गातच राहावे,
झाले गेले विसरून जावे,
पुढे पुढे चालावे…”
रोजच्या जीवनात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या क्षणी स्वतःला हे सांगवेच लागले असते. हेही दिवस जाणार आहेत. यशाच्या शिखरावर असलेल्या व्यक्तिच्या प्रत्येक गोष्टींची चर्चा होते, प्रसिद्धी मिळते. त्यांच्या Struggle चे सुद्धा दाखले दिले जातात. आदर्श म्हणून ते सांगितले जातात. सर्वसामान्य माणूस सुद्धा संघर्ष करतोच पण बरेचदा हा संघर्ष त्याला एकट्यालाच माहीत असतो किंबहुना त्याप्रमाणात त्याला मिळालेलं यश हे लौकिक अर्थाने तितके मोठे नसते, असं त्याला वाटतं म्हणून त्याची चर्चा टाळली जाते. यश हे प्रत्येक वेळी तारांकितच असले पाहिजे असे नाही. सामान्य लोकांची छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठीची धडपड आणि ती मिळाल्या नंतरचे समाधान हेही यशस्वी होणेच आहे. ह्या दरम्यान करावा लागणारा संघर्ष सुद्धा ज्याच्या त्याच्या परिस्थिती नुसार कठीण असुच शकतो. प्रत्येक वेळी एखाद्या स्केल वर त्याची पडताळणी करणे अयोग्य आहे. एखादी व्यक्ती ज्या स्थितीतून वर आली असेल हे न जाणता पात्रता ठरवणं गैर आहे.
कोणत्याही परिस्थितीत स्वतःला प्रोत्साहित करत राहाणे महत्वाचे आहे. हे प्रोत्साहन एखाद्या प्रसंगातून, अपघातातून, आर्थिक फटाक्यांमुळे किंवा एखाद्या चांगल्या गोष्टिंमुळे सुद्धा मिळू शकते. कोण व्यक्ती कशामुळे प्रभावीत होईल हे सांगता येणे अवघड आहे पण प्रभावीत झाल्यानंतर त्या व्यक्तीने सत्कर्म करणे सर्व दृष्टीने गरजेचे आहे. अन्यथा निराशा येते आणि चुकीचे पाऊल पडू शकते.
म्हणूनचं स्वतःला motivate करत राहिले पाहिजे आणि गुणगुणले पाहीजे ,”जीवन गाणे गातच राहावे…” आणि चांगल्या गोष्टी करून मिळालेल्या यशाचा आनंद घेतला पाहिजे.
पोस्ट आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.
सौ.मंजिरी जानोरकर.

