“मराठी असे आमुची मायबोली
जरी आज राज्यभाषा नसे…”
मराठी भाषेविषयी प्रेम,आदर, आपुलकी असलीच पाहिजे. हो कारण ती मातृभाषा आहे. जन्मभूमी आणि मातृभाषा ही आई इतकीच पूजनीय असायलाच हवी. माणूस आपल्या आईकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा मानतो. मग ती भाषा कोणती हे कळण्याचे त्याचे ते वयही नसते. संवाद साधण्यासाठी भाषेचा जन्म झाला. सगळ्यात आधी कोणती भाषा तयार झाली हे सांगणे कठीण आहे. भाषा कोणती आहे ह्यापेक्षा संवाद माध्यम म्हणून तीचा वापर केला गेला.
कोणताही भाषा आधी फक्त बोलीभाषा असते नंतर त्यात व्याकरण येतं,शास्त्रशुद्ध भाषा, लेखनाची भाषा, साहित्यिक भाषा अशा अनेक गोष्टी हळूहळू विकसित होत जातात. गरजेप्रमाणे शिकल्या, शिकवल्या जातात. ह्यातूनच भाषा वृद्धिंगत होते.
आज शालेय शिक्षणात महाराष्ट्रात मराठी भाषा विनाविकल्प शिकवली जाते. सर्व माध्यमांना ते अनिवार्य केले आहे पण पुढे जाऊन विद्यार्थी मराठी पासून तुटतं जातात. घरात बोलण्यापुरताच तीचा वापर होतो. मराठी वाचन, लिखाण ह्याचा कंटाळा करतात अगदी मराठी मातृभाषा असणाऱ्यांची हिच अवस्था आहे. आपल्याच भाषेविषयी अनास्था दिसते वाचन,लिखाणाचा सराव राहात नाही. बोलीभाषा सुद्धा संमिश्र असते. हे सगळे टाळायला हवे. आपल्या भाषेचा अभिमान वागण्याबोलण्यात दिसला पाहिजे. त्यातील शुद्धता शक्यतो पाळली पाहिजे. तरच इतर भाषांचा आदर करता येईल. चारचौघांत भाव खाण्यासाठी आपलीच भाषा न बोलता सर्व भाषा एकत्रित करून संमिश्र संवाद साधणारी तरूण पिढी आपल्या सगळ्याच गोष्टींपासून तुटत चालली आहे.
भाषा दिनाच्या निमित्ताने भाषांचे गोडवे गायले जातात आणि नंतर सर्व विसरले जाते. अशा परिस्थितीत ती राजभाषा कधी आणि कशी होईल हे पाहाण्यासारखे असेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाट पहावी लागेल.
पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा.
सौ मंजिरी जानोरकर.

