चांदण्यांचे हात

      “चांदण्यात फिरताना माझा धरलास हात 

          सखया रे आवर ही सावर ही चांदरात…”

   कायमच आकाशात असुनही चांदण्यांची गंमत रात्रीच असते. चांदण्या म्हणजेच तारे. जशी चांदण्यांची गंमत आहे तशीच तारांकित वलयाची गंमत आहे त्यापेक्षाही आकर्षण आहे.  प्रत्येक व्यक्तीला ‘Stardom’ जास्त आकर्षित करते. मग कोणी  मालिका, चित्रपट अथवा नाट्यसृष्टीतला एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री असेल तर त्यांना बघण्यासाठी, भेटण्यासाठी, अगदी  त्यांच्या सोबत  एखादा फोटो  मिळवण्यासाठी लोक गर्दी करतात ह्याचे कारण त्यांची प्रसिद्धी हेच असते.  

         प्रसिद्ध, वलयांकित व्यक्तीला आदर्श मानणं अथवा त्याच्या बद्दल कुतूहल असणं स्वाभाविक आहे आणि त्यात चूकीचे काहीच नाही. उलट अशा व्यक्तीमत्वाचा त्यांच्या प्रसिद्ध असण्याचा योग्य गोष्टींकरता उपयोग करून घेता आला पाहिजे.  त्यांनीसुद्धा समाजासमोर काही आदर्श जाणीवपूर्वक घालून दिले पाहिजे.

    विषयाला धरून आहे म्हणून एक अनुभव सांगावासा वाटतो. मी हे लिखाण बऱ्याच दिवसांपासून करते आहे. ह्या मराठी ब्लॉग च्या माध्यमातून मी इतर  सामाजिक माध्यमांपर्यंत (Social media) पोहोचण्याचा प्रयत्न करते आहे आणि ह्या ब्लॉग साठी फोटो टकते पण जेव्हा एका प्रसिद्ध नाटकातील प्रसिद्ध जोडीचा फोटो ठेवला त्यावेळी वाचकांची संख्या आणि लेखन आवडले हे सांगणाऱ्यांची संख्या जास्त राहीली आहे.  आहे ना गंमत 

     चांगल्या गोष्टी, वस्तू ह्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा चांदण्यांचा हात हातात घ्यावाच लागतो हे मात्र खरं.

पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा.

                             सौ.मंजिरी जानोरकर.