कधी कधी खरंच वाटतं
प्रेम म्हणजे नेमकं काय असतं 🤔
गुलाबाचे फुल घेऊन
मागं मागं फिरणं असतं
की हातात हात घालून
बागेत बसणं असतं ?
प्रेम म्हणजे एक ‘डील’ असतं
सगळ्या नात्यांमध्ये ते
अलिखित असतं
आई-वडीलांचं आणि मुलांचं
प्रेम नैसर्गिक असतं
अपेक्षांचं ओझं तिथे नसतं.
पतिपत्नींचं प्रेम तसं जरा
दुर्लक्षित असतं
ते व्यक्त करायला समाजाचं
भान ठेवावं लागतं
कुटुंबातील लोक काय म्हणतील ?
मित्र मैत्रिणी चिडवतील
या विचाराने एकमेकांच
बोलणंच खुंटतं
टाळी वाजवायला दोन हात
अन् संसारात दोघांची साथ
एवढं सोपं गणित
कठीण होत जातं आणि
नातं फुलायचं राहून जातं.
प्रेमाला खरंतर काही नकोच असतं
प्रेमाला खरंतर काही नकोच असतं
एकमेकांना वेळ द्या
इतकंच ते म्हणत असतं
प्रेम म्हणजे नसते शरीराची भूक
त्याला हवं असतं सहवासाचा सुख
सहवासाचा सुख.
सौ. मंजिरी जानोरकर.

