Imotional मेलोड्रामा

“अरे भाई कितनी बार बोला तुझे इमोशन मंगता है इमोशन। पब्लिक रोनी चाहिए समझा क्या? कुछ भी स्टोरी बना, गरीबी, बिमारी कुछ भी चलेगा। लोगोंके आंखों में आसूं आने चाहिए बस।”

“सर लेकिन यह प्रोग्राम तो गाने का है ना? और सब अच्छा गानेवाले है……” “अब तू मुझे सिखाएगा की ये कोनसा प्रोग्राम है? ये मेरा खुद का शो है समझा मैंने तुम्हें असिस्टेंट रखा है, ज्यादा सिखा मत जो बोला उतना कर। मुझे टी. आर.पी. चाहिए और तुम सबको देने के लिए पैसा क्या समझा? बाकी सब होता रहेगा। जितना बोला वही करने का खुद का दिमाग नहीं दौडाने का, जमता है तो कर वरना निकल बहुत मिलेंगे तुझ जैसे।

टिव्हीवरच्या एका गाण्याच्या रिअलिटी शो चे आयोजन करणारा प्रितेश एका मोठ्या डिटेक्टर कडे असिस्टंट म्हणून काम करत होता. तसं त्याचं काम चांगलं होतं आणि अनुभव घेण्यासाठी काही काळ अशा मोठ्या निर्माता दिग्दर्शकांकडे राहाणे गरजेचं होतं. प्रितेश नवखा होता, डिरेक्टरचं ते बोलणं त्याला सहन झाले नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. नेमकं हे त्याच्या सहकारी मित्र निखिल ने बघितलं खरंतर हे काम निखिलनेच त्याला मिळवून दिलं होतं. प्रितेश सगळ्यांची नजर चुकवून बाहेर पडतच होता इतक्यात मागून निखिल ने त्याला आत ओढले. क्षणभर त्याच्या खांद्यावर हात दाबून डोळ्यांनी त्याला आधार दिला आणि कामाला लाग असे सुचवले. नाईलाजाने प्रितेश आत वळला पण उद्यापासून इथे असा अपमान सहन करण्यासाठी यायचं नाही हे मनात त्याने ठरवून टाकले. नंतर बराच वेळ शुटिंग चालू होते. गाणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला त्याची पुर्व आयुष्य कथा background विचारली जात होती आणि कोणता भाग अधिक रंगवून सांगावा हे सांगण्याचे काम ही सगळी असिस्टंट मंडळी करत होती. डिरेक्टर चेहेऱ्यावरचे भाव face expression कसे ठळकपणे दिसतील तो angle केमेरामन ला लावण्याचे आदेश देत होता. “Background सांगताना आवश्यक वाटल्यास अश्रू आले तर जास्त छान , शक्य तितक्या प्रभावीपणे तुमची इमोशनल सिच्युएशन मांडा, ढसढसा रडा आणि रडण्यासारखं सांगायला काही तरी स्टोरी शोधून काढा , आजि गेली, भाऊ – बहीण कोणीतरी कधीतरी आजारी पडला असेल, मनी प्रोब्लेम काही पण ते आठवा.” आशा सूचना वारंवार दिल्या जात होत्या. गाण्याच्या रिअलिटी शो मध्ये हे नेमकं काय सुरू आहे ते प्रितेशला कळत नव्हतं तो या सगळ्यात गांगरून गेला होता.

25 स्पर्धकांपैकी जेमतेम 2-3 जणांच शूट होऊ शकलं. बाकी सगळे प्रितेश सारखे गाणं सोडून हे काय हे न समजल्यामुळे गोंधळात पडले होते. शूट संपवून packup म्हणताना “अरे निखिल कल थोड़ा होमवर्क करवाके लाना सबको आज टाइम बहुत खोटी हुआ। कल ऐसा नहीं होने को मंगता। समझाना तेरी जिम्मेदारी है बोल देता हूं। ये नये लडका लोग को भी सिखा कुछ। इंडस्ट्री में नये हैं, अभी स्कूल का चश्मा उतरा नहीं है और चले मुझे सिखाने।” जाताजाता डिरेक्टर प्रितेश कडे बघत निखिलला सांगून गेला. खाली मान घालून तिरक्या नजरेने त्याने निखिल कडे पाहीले आणि त्याने नाराजी दर्शवली. कामं संपवून सगळेजण निघून गेले. प्रितेश आणि निखिल जवळपास राहात होते ते एकत्र निघाले. जाण्याआधी उद्या वेळेच्या एक तास आधी येण्याची सूचना निखिल ने सगळ्यांना केली.

घरी जाताना प्रितेशच्या गळ्यात हात टाकत निखिल बोलू लागला, ” प्रितेश आपण करत असलेलं काम हे फक्त काम नाही आहे तो एक शो आहे आणि शो म्हणजे काय दिखावा ना मग तेच तर हवंय लोकांना. जिथे Imotion तिथे लोकप्रियता मिन्स के Publicity और क्या? जितकी पब्लिसिटी जास्त तितका टी.आर.पी. जास्त. बस पैसा पाहिजे रे बाकी सर काय बोलले ते विसरून जा तेही विसरतात लगेच सगळं उद्या बघ जेवायला घेतील तुला शेजारी. त्यांच्या मनात काही नसतं रे. फक्त त्यांना जसं हवं तसं करायचं आणि करून घ्यायचं बास . त्यांना इंडस्ट्री चा खूप अनुभव आहे आणि हे जे काही ते करत आहेत ते त्यांना हवं म्हणून नाही Its on public dimand. खूप सारे सरळसोट प्रामाणिकपणे केलेले अनेक शो सरळ सरळ डब्यात गेले आहेत त्यांचे. मी खूप वर्षे काम केले आहे त्यांच्या कडे आता असिस्टंट कमी मित्र समजतो मी स्वतःला त्यांचा आणि तेही मला. बरेचदा मन मोकळं करतात माझ्याजवळ म्हणून मला माहिती, यातलं सगळं बाहेर येत नाही रे. आपल्या समोर फक्त गुडी गुडी असेल ते किंवा मसालेदार gossip येत असतं. खरं सांगू का फक्त इंडस्ट्रीच नाही तर हे सगळं जग एकमेकांची एकतर उणीधुणी काढत असत किंवा कुठे काय शिजतंय आणि चघळायला मिळतंय हे शोधत असतं. सगळं आपण फार मनाला लावून घ्यायचं नसतं एवढं. मिळेल तितकं शिकायचं आवडेल ते करायचं काय समजतय ना तुला?”

सगळं जरी पटत नसलं तरी चुकीचे काही नव्हते तसही इतक्या नावाजलेल्या Production house मध्ये काम करतोय हे सांगताना कुठेतरी प्रितेशची collar कडक होणार होती आणि पुढे जाऊन फायदा सुद्धा होणार होताच की….