हिंदूत्व आणि क्रांती

ट्रॅफिक मुळे ऑफिस मधून घरी यायला उशीर झालेली मंदिरा तणतणतच घरात आली. आज्जी वाटच पाहत होती, मंदिरा आवरुन येईपर्यंत आज्जीने अन्न गरम करून जेवायला वाढले. तितक्यात मंदिराचा फोन वाजला, ” ए बाबा आधी ते मंदिरा म्हणणं बंद कर बरका call me Maddy!! मंदिरा फार ओल्ड फॅशन and so बोअरिंग आहे. आता बोल …होना रे बांगलादेशातील हिंदू लोकांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात निदर्शनं सुरू आहे म्हणून उशीर झाला हो How dangerous and it’s ridiculous, how can they do like this?? It’s so unhuman. मलाही खरंतर थांबायचं होतं पण मग आज्जी ला काळजी वाटली असती. ” हे आणि बरचसं बोलून झाल्यावर मंदिरा जेवायला आली, आल्या आल्या भाजी-पोळी बघून म्हणाली ए आज्जी ! This dinner is so poor. Make something interesting like Pizza, pasta, Italian, Mexican etc etc…” झेन झी मंदिराला सगळं पाश्चिमात्य देशांमधील आवडायचं अगदी कपडे, जेवण राहणीमान. त्यामुळे तिचं हे रोजचंच बोलणं ऐकून आज्जी फक्त हसली. नाईलाजाने जेवण सुरू करत बांगलादेश मध्ये हिंदू लोकांवर कसा अत्याचार झाला ते ती आज्जीला सांगत होती. सगळं बोलणं झालं आणि एक गूढ शांतता पसरली. मग एक मोठा सुस्कारा सोडत आज्जी कुत्सितपणे हसली. तिच्या अशा हसण्याचा अर्थ न समजून मंदिरा म्हणाली,” अगं हसती आहेस तू हे ऐकून??” “नाही गं जे झालं ना तिकडे ते वाईट आहे फार फार वाईट त्याला नाही हो हसले मी पण मी हसले ते तुझ्या आणि बेडगी प्रेम करणाऱ्या तुमच्यासारख्या स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या सगळ्यांना.” प्रश्नार्थक नजरेने मंदिरा आज्जी कडे बघतच राहिली, “अं काय! काय म्हणती आहेस तू आज्जी What is bedgi?? What do you mean exactly?? ” म्हणजे असं बघ तू भारतीय हिंदू आहेस म्हणजे तू स्वतःला तसं सांगतेस I mean you pretend it” काय बोलतेस आज्जी तू , तुला तरी कळतंय का?? ” आज्जीला मधेच तोडत मंदिरा जवळ जवळ ओरडली. ” ऐक अगं शांतपणे म्हणजे तुझा जन्म हिंदू कुटुंबात झाला आणि भारतात झाला फक्त म्हणून आणि म्हणून तू भारतीय हिंदू आहेस.” मधेच बोलू पाहणाऱ्या मंदिराला हाताच्या खुणेने थांबवत ती पुढे म्हणाली,” पण तुला तर सगळं परदेशी आवडतं बघ ना तुझं नाव मंदिरा पण you like Maddy, जेवण सुद्धा Italian, Mexican etc साधं सरळ घरचं जेवण नको. कपडे पण पंजाबी ड्रेस, साडी, पारंपरिक पेहराव तर तुम्ही मोडितच काढलाय. सणसमारंभ नाही आवडत दिवाळीच्या फटाक्यांनी म्हणे प्रदुषण होतं मग What about New year celebrations? तेंव्हा चालतात फटाके, मग प्रदुषण नाही होत का?? गुढीपाडव्याच्या दिवशी साडी नेसून येणं गावठी आणि ख्रिसमस स्पेशल evening gown तो त्यांचा पारंपरिक ड्रेस गावठी नाही. दिवाळी, होळी, नवरात्रात होणाऱ्या फराळाच्या पदार्थांनी म्हणे वजन वाढतं आणि केक, पिझ्झा, बिस्कीटस यांनी काय होतं?? Indian Healthy food is always good. Indian festival food is also decided by seasonal priorities. म्हणजे थंडी मध्ये digestion चांगल्या प्रकारे होते म्हणून पचायला जड पदार्थ खाऊ शकतो आपण. तसंच इतर सणांच पण आहे. या सगळ्यांचा नीट विचार करून परंपरा चालू आहेत. कोणत्याही प्रकारचे अंधानुकरण नाही. तुम्ही डोळसपणे पाहण्याची गरज आहे. या उलट अविचाराने सगळ्याला विरोध करायचा आणि स्वतःला modern समजायचे. मग तुम्ही कसे भारतीय हिंदू?? हां हां माणूस म्हणून सहानुभूती असणं स्वाभाविक आहे अत्याचार कोणीच कोणावर नाही केले पाहिजे आणि करणाऱ्यांना विरोध सुद्धा झाला पाहिजे. त्या आधी हिंदूत्व म्हणजे काय?? त्यांच्या परंपरांची माहिती, महत्व आणि उपयोगिता हे सगळं मूळ हिंदूंना माहीत असणं अपेक्षित आहे तसंच त्याचा आदर आधी त्याने स्वतः केला पाहिजे अन्यथा बऱ्याच गोष्टींकरता निदर्शनं होतच असतात पण या निदर्शनाच जास्त महत्त्व का आहे ते कळेल. मोगलांनी , इंग्रजांनी, पोर्तुगीजांनी उघड उघड आक्रमणं केली पण हिंदूंमधील हिंदूत्व संपवण्याचे हे छुपे आक्रमण जास्त घातक आहे. झेन झी पिढीच नाही तर बरीच मोठी मंडळी सुद्धा परंपरांना विना विचार विरोध दर्शवत आहेत खरी क्रांती हिंदूंच्या विचार आणि आचारातून होते पण आपल्या मूळ हिंदूत्वावरच या हिंदू राष्ट्रातच घाला घातला जातो आहे हे दुर्दैव आहे. अहिंसक अत्याचार इथेही चालू आहे. दुर्दैवाने त्याला विरोध करणाऱ्या आमच्या सारख्यांना घरातल्यांबरोबरच लढावं लागतं आहे .” आज्जी हताशपणे उठून आत गेली आणि मंदिरा विचारत पडली की आपण ज्या आज्जी ला old granny तिच्या सारखीच जुन्या विचारांची समजत होतो ती किती तरी जास्त प्रगल्भ विचारांची आणि अभ्यासू आहे. I have to follow her thoughts and need to tell my friends and colleagues. Maddy आता मनापासून मंदिरा झाली होती . तिच्या विचारात क्रांतिकारक बदल झाला होता.