“आई सारखे दैवत साऱ्या
जगतावर नाही ….”
आई ची थोरवी माहीत नाही असा माणूस शोधून सापडणे अशक्य आहे.
प्रत्येक स्त्री मध्ये एक आई असतेच, त्याकरता तीने स्वतः आई असलेच पाहिजे असे नाही. कोणत्याही वयाची मुलगी अगदी आपल्या आईचीही आई होऊच शकते. वेळ प्रसंग पाहून जबाबदारी स्वतःवर घेण्याचा स्त्रीचा मुलभूत स्वभाव आहे. हे नाकारता येणार नाही. अर्थात बरेचदा ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेतला जातो आणि स्त्रीलाच वेठीस धरले जाते. हे चूकीचे आहे.
स्त्री हीच बरेचवेळा स्त्री ची शत्रू असते. आपल्या मुलीची आई होणारी बाई सुनेची, नणंदेची आई किमान मैत्रीण होऊ शकत नसते. असो!
आजच्या मुलींना आई होणं हे जरा जड जातंय, असं एकूण चित्र आहे. मुळात करीअर करण्याच्या नादात लग्न उशिरा मग काही काळ प्रतीक्षा आणि नंतर मुलांचा विचार ते सुद्धा एकच. अर्थात ही खूपच ‘personal’ बाब आहे. इतर कोणी बोलणं गैरच आहे पण आज ही चर्चा आवश्यक आहे. कारण समाजातील सुशिक्षित, संस्कारित लोकसंख्या कमी होते आहे. त्यामुळे समाजाचा पर्यायाने संपूर्ण कुटुंब व्यवस्थेचा तोल बिघडतो आहे. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सर्वच विवाह उत्सुक तसेच नवविवाहीत तरूण-तरुणींनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. योग्य वयात लग्न, मुलं हे सगळं सुरळीत व्हावे हे घरातील थोर मंडळी सुद्धा वारंवार सांगत असतात पण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.
आपल्यातील मातृत्व-पितृत्वाचे मूलभूत नैसर्गिक भावना जाणून त्या भावनेचा आदर करणे अपेक्षित आहे.
अनेकदा मुलांकरता दवाखान्याच्या, मंदिरांच्या चकरा मारणारी लोकं पाहिली की मन भरून येते. इतर सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करताना आई-वडील होण्याचा आनंद सुद्धा उपभोगता आलाच पाहिजे.
पोस्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा.
सौ.मंजिरी जानोरकर.

