नमस्कार,

गेली पंचवीस वर्षे मी एक गृहिणी म्हणून कार्यरत आहे. एक स्त्री म्हणून आणि आई म्हणून मी स्वतः घडत गेले. मुलांचे संगोपन करताना त्यांच्या समस्या, प्रश्न सोडवत सोडवत मीही शिकत गेले. त्याच काळात मला माझ्या मुलांच्या शाळेत पालक शिक्षक संघाचे काम करण्याची संधी मिळाली. यामुळे शिक्षकांच्या समस्या जाणून घेता आल्या. लेखनाची आवड होतीच मग मी शक्य असेल तिथे या विषयावर लिहायचे तेंव्हा काही ओळखीचे तर काही अनोळखी लोक अनुकूल प्रतिसाद देत त्यामुळे लिखाणाला प्रेरणा मिळाली. मुलं मोठी झाली आणि समस्या बदलत गेल्या. मुळातच मानसशास्त्रात बीए केलं असल्याने आणि शिक्षिका म्हणून काम करण्याची उर्मी यातून मी चांगल्याप्रकारे समुपदेशन करू शकते हे जाणवत होतं. जवळच्या लोकांनी प्रोत्साहन दिले तसच काहीतरी चांगलं काम करण्याची इच्छा होतीच. आपल्या बोलण्यातून कोणाला काही मदत मिळत असेल तर काय हरकत आहे असं वाटलं आणि आपल्या आपल्यात समुपदेशन करायचे ठरवत आहे. या वेळी विषय मात्र विवाह पुर्व समुपदेशन हा निवडला आहे. सामाजात असलेल्या बऱ्याच समस्या यांच्या मुळाशी कुठेतरी कुटुंब व्यवस्था जबाबदार आहे असे वाटले ही कुटुंब संस्था नीट चालण्यासाठी आधी तरूणाईचे लग्नसंस्था या विषयावर काय विचार आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. भविष्यात आईवडील म्हणून जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी पतिपत्नी म्हणून होणारी जडणघडण जास्त परिणामकारक असणार आहे. या विचाराने मी विवाह पुर्व समुपदेशन हा विषय निवडला. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच समाज बदलेल, समस्या कमी होण्यास मदत होईल म्हणून हा प्रयत्न.

सौ. मंजिरी जानोरकर