Skip to content
आपल्या कविता आपल्या पुरत्या
सिमीत असतात
भावभावनांच्या हिंदोळ्यावर
डोलत असतात
सावरकर,अटलजींसारखे कवी
ज्ञान सागरात
दीपस्तंभा प्रमाणे ऊभे दिसतात
तर
ग.दि.मां. सारखे कवी
मनमंदिरांत वसतात
विश्वाच्या ह्या नभांगणात अनेक
चंद्र-सूर्य असतात
माझ्या सारखे काजवे
क्षणभर चमकून विझत
असतात
लाखो तारे रात्रीच्या अंधारात
लुकलुकतात
पण नक्षत्र मात्र चिरकाल
टिकतात, चिरकाल
टिकतात.
सौ. मंजिरी जानोरकर
खुपच छान