” देश हा देव असे माझा
अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा…”
“भारत माता की जय,वंदे मातरम” ही गर्जना निर्भीड पणे करत क्रांतीकारकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. ह्याला काल ७५ वर्ष पूर्ण झाली. आजही आपले जवान सीमेवर तैनात आहेत आणि प्राणांची पर्वा न करता आपल्याला सुरक्षित ठेवत आहेत, ते देशाला देव मानण्याच्या आणि प्रेमाच्या भावनेतून. स्वत:ची पर्वा न करता बलीदान देणं ही त्याग भावना आदरणीय आहे.
देशवासियांनी आपल्या कर्तव्यांचे पालन करणे, स्वच्छतेचे भान ठेवणे, रस्त्यांवरचे नियम पाळणे, स्वयंशिस्त अंगी बाणणे अशा अनेक गोष्टि कोणतेही बलीदान न देता देशाकरता आणि स्वत:करता करता येऊ शकतात, त्या करण्या करता कोणा इतराने आपल्याला भाग पाडावे हि लाजिरवाणी बाब आहे. १५ तारखेला देशप्रेमाची गाणी म्हणुन,रंगीत कपडे घालून किंवा फक्त झेंडे फडकवून देशावरचे प्रेम सिद्ध होत नाही. देशाला मनापासून देव मानणं ही आजची गरज आहे.
आपला देश स्वच्छ आणि सुरक्षित असेल तर आणि तरच आपण आणि आपले घर असणार आहे. नाहीतर काल ईंग्रज आणि उद्या कोणी तालिबानी असे व्हायचे.
फुकाचा अभिमान बाळगण्यापेक्षा अभिमानाने जगता येणे आवश्यक आहे.
“भारत माझा आहे आणि मी ह्या भारताचा” हे मना-मनावर बिंबले गेले पाहिजे. आणि कृतीत उतरले पाहिजे तो खऱया अर्थाने स्वातंत्र्य दिन असेल.
पोस्ट आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.
सौ.मंजिरी जानोरकर.


Kharay