” लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती..”
प्रेम, प्रीती खरंच खूप छान आणि मोठी संकल्पना आहे. लाखो चुका पोटात घेण्याची ताकद आहे. आई-वडील,पति-पत्नी, भाऊ-बहीण अगदी मैत्री घ्या नात्यात सुद्धा प्रेम असतेच. राधा कृष्ण, कृष्ण सुदामा हि प्रेमाची आणि मित्र प्रेमाची दोन्ही ची आदर्श उदाहरणे आहेत. कृष्ण आपला कधीच होणार नाही हे माहित असूनही त्याची आठवण आयुष्य भर उराशी बाळगून राहिली हे निस्वार्थी प्रेम.
आपल्या गरजा ओळखून त्या मनापासून पूर्ण करण्यासाठी निरपेक्ष भावनेने धडपडणारी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते हे समजायला हरकत नाही पण अवाजवी अपेक्षा करणारी व्यक्ती स्वार्थी आहे हेही निश्चित. प्रेम हि संकल्पनाच मुळात स्वार्थ, परमार्थ, अपेक्षा ह्या पलिकडची आहे. प्रेम करण्यासाठी शिक्षीत असण्याची आवश्यकता नाही. कारण अडाणी आई सुद्धा आपल्या मुलांना प्रगल्भ विचारांनी मोठे करु शकतेच. हि तिच्यातल्या आई ची ताकद असते. अशिक्षित पत्नी,बहिण, भाऊ अगदी जवळची कोणीही आपलं माणूस गंभीर प्रसंगी पाठीशी उभे राहाते ते ह्या प्रेमापोटीच.
सुख आणि दुःख ह्य दोन्ही प्रसंगी जुने रुसवे फुगवे विसरून, अनेक चुका पोटात घालून दिलासा देणारी,न बोलावता सोबत येऊ शकणारी माणसं प्रेम म्हणजे काय हे जाणून असतात आणि प्रेम करतही असतात. अशा लोकांना आपल्या आयुष्यात सांभाळून ठेवणं ही ज्याची त्याची जबाबदारी आहे, हो ना.
हि पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा 🙏🏻
सौ.मंजिरी जानोरकर

