“देहाची तिजोरी,भक्तीचाच ठेवा,
उघड दार देवा आता उघड दार देवा..”
आपल्या देहाचे म्हणजेच शरीराचे त्याहीपेक्षा अंत:करणाचे दार देवला उघडायला सांगितले आहे ते का??
भक्तीचा ठेवा म्हणजे समाधान आणि संयम. ह्या दोन्ही फार मोठ्या गोष्टी आहेत. ऐकायला सोप्या वाटल्या तरी अनुभवणं, त्या आमलात आणणं कठीण आहे.
एखाद्या दाराबाहेर दार वाजवुन ते उघडे पर्यंत थांबणं म्हणजे संयम. कारण काही क्षण किंवा मिनिटे थांबणं ठिक आहे पण जसाजस वेळ वाढतो तसतसा संयम संपतो. अनेकदा प्रत्येकाने हा अनुभव घेतला असतोच. पोस्टमन,कुरीयर boy, पार्सल घेऊन येणारी मंडळी हा भक्तीचा ठेवा ट्रेनिंग सेंटर मध्ये शिकुनच कामाला लागत असावेत. अर्थात फूड पार्सल घेऊन येणारा हा त्याबाबतीत नशीबवान असतो. असो, आपल्या जवळच्या व्यक्तीची प्रगती, भरभराट झाली, यश मिळाले की मन समाधानाने आणि डोळे आनंदाने भरून येणे म्हणजे हा आनंदाचा ठेवा सापडणं. मग ती व्यक्ती आपली प्रतिस्पर्धी असली तरीही. हे अवघड आहे म्हणूनच दार आतून उघडलं जात नाही मग देवाला उघडायला सांगितले आहे. स्पर्धा आणि परिक्षा ही यश मिळवण्यासाठी आहेच पण त्याचबरोबर तुलना सुद्धा मोकळ्या मनाने केली गेली पाहिजे. समोरच्या व्यक्तीला मिळालेले यश, पैसा, किर्ती आपल्याला सुध्दा मिळवता येईल तोपर्यंत संयम हवा. चांगल्या मार्गाने प्रयत्न केला की यश मिळणारच हा विश्वास हवा. असं झालं की मग आनंदाचे झाड आपलेच आहे.
ही पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा 🙏🏻
सौ मंजिरी जानोरकर

