आई अंबिके, रणचंडीके
तू जागी हो आता ||
माजला वासनासूर
अत्याचार पसरला सर्वदूर
ना उरला कोणी त्राता
तू जागी हो आता ||
घेऊन हाती खड्ग़ं
करी कामासूरा भग्नं
रक्षी रक्षी या भक्ता
तू जागी हो आता ||
हे दयानिधी,करुणामयी
असशी जरी तू माता
त्राही त्राही करी ही जनता
तू जागी हो आता ||
आई अंबिके, रणचंडीके
तू जागी हो आता||
सौ. मंजिरी जानोरकर

