आनंदाचा ठेवा

        “जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा..” 

     माणसाला वेड लागणं हे खरेतर मानसिक आरोग्य बिघडण्याचे लक्षण आहे, पण हे वेड सामान्य माणसांमध्ये अधुनमधून दिसत असते. आपल्या नेहेमीच्या वर्तना पेक्षा काहीतरी विपरीत वर्तन  करणे म्हणजे वेड्यासारखे वागणे. प्रत्येक माणसात एक लहान मुल लपलेले असते आणि मधुनच ते बालपण डोकावते पण समाजाचे भान जपण्याच्या नादात प्रत्येकजण त्याला आत दाबतो. 

          खरंतर आपल्या वयाचं, समाजाचं,आजुबाजूचं भान विसरुन सगळ्यांनीच महिन्यातुन,आठवड्यातुन एकदा तरी हे वेडेपण जगलं पाहीजे. आपल्यातल्या लहान मुलांत मुल होऊन नाचलं पाहीजे,ओरडलं पाहीजे, अगदि “गाना आए या ना आए गाना चाहीये.  मग कोणतेही कारण असो लग्न,मुंजीचे निमीत्त असो किंवा एखादे धार्मिक-पूजन असो. माणसाने त्यात रममाण होऊन आनंद मिळवला पाहीजे. 

       एखाद्या गोष्टित रममाण होणे हेच तर वेड आहे. संत सुद्धा परमेश्वर चरणी रममाण होतात, लोक त्यांनाही वेडे च समजत असत पण मग ह्याच रमण्यातून जेंव्हा समाज घडवण्याची दृष्टि त्यांनी दिली, त्यावेळी त्यांचे मोठेपण जाणवले. 

       वेडेपणा हा समाज विघातक ठरला नाही म्हणजे झाले. कारण आयुष्यात आनंद महत्वाचा आहे. थोडेसा वेडपणा करून जर तो मिळत असेल तर कधीकधी वेडे होऊन पेढे खाण्याची गंमत घ्यायला हरकत नाही. 

   सुख-सुख म्हणजे तरी काय आनंदी जगणे. हा आनंदाचा ठेवा प्रत्येकाला मिळणे आवश्यक आहे.

    

  पोस्ट आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.🙏🏻👍🏻

                               सौ.मंजिरी जानोरकर.