गेली पंचवीस वर्षे मी एक गृहिणी म्हणून कार्यरत आहे. एक स्त्री म्हणून आणि आई म्हणून मी स्वतः घडत गेले. मुलांचे संगोपन करताना त्यांच्या समस्या, प्रश्न सोडवत सोडवत मीही शिकत गेले. त्याच काळात मला माझ्या मुलांच्या शाळेत पालक शिक्षक संघाचे काम करण्याची संधी मिळाली. यामुळे शिक्षकांच्या समस्या जाणून घेता आल्या. लेखनाची आवड होतीच मग मी शक्य असेल तिथे या विषयावर लिहायचे तेंव्हा काही ओळखीचे तर काही...
Continue reading...Uncategorized
नावात काय आहे ??
। “काकू…काकू अहो काकू, प्रभाताई!!” इतक्या हाका मारल्यावरही न थांबणाऱ्या काकू म्हणजेच प्रभाताई लगेच थांबल्या. मागे वळून पाहताना,” अगं तू होय ?” असं विचारत नाजूक हसल्या. “तुला माझं नाव कसं ग माहीत? काकू काय हल्ली कोणीही कोणालाही म्हणतं, ना वय पाहात, ना त्या व्यक्तीचे मत. स्त्री ला काकू अन् पुरुषांना काका करण्यात कसली धन्यता वाटते कोणास ठाऊक?? हं बाकी तू बोल समिरा.” असं म्हणून काकूंनी...
Continue reading...नमस्कार,
“मनाचिये घावावरी, मनाची फुंकर|” manjireesblog.in च्या ब्लॉग माध्यमातून जरी मी आत्ता सुरवात केली असली तरी सकाळ, ब्राह्मण मानस (मासिक), लोकमत पुरवणी तसेच manjirees.blogspo.com या सगळ्यांतून माझे लिखाण सुरू होते. वाचकांचा प्रतिसाद मिळत होता त्यातुनच ही website सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. पुण्यात शिक्षण घेत असताना काही काळ नोकरी करत मानसशास्त्रात बीए केलं. भरत देसाई, सविता देशपांडे यांच्या सारखे शिक्षक गरवारे महाविद्यालयात लाभले. त्यांनी फक्त शिकवलं नाही...
Continue reading...जाणीव -नेणीव
सरदार सरपोतदार एक मोठे घराणं होते. विश्वासराव सरपोतदार हे वतनदार होते. सावित्रीबाई त्यांच्या पत्नी घराण्याची परंपरा,आब राखून होत्या. बरीच नोकरचाकर हाताखाली कामाला होते. त्यांचा तामझाम त्याच सांभाळत. विजय सरपोतदारांचे म्हणजे थोरल्या चिरंजीवांचे नवीन लग्न झालं होत आणि विशाखा या वाड्यात नुकत्याच राहायला आल्या होत्या. शहरात वाढलेल्या विशाखाला इतक्या नोकर चाकरांची सवय नव्हती, लहानसहान कम सुद्धा त्यांच्या कडून करून घेणं तीला जमतही नव्हत...
Continue reading...केक कापणे इज मस्ट
सावित्रीबाई फुले शाळेत ३५ वर्षे शिक्षिका आणि शेवटी पाच वर्षे मुख्याध्यापिका म्हणून काम केल्यानंतर आज अखेर वसुधाताई सेवा निवृत्त होणार होत्या. सगळ्यांच्या लाडक्या बाईंना sendoff देण्याची आणि सोबतच एक serprise पार्टी विद्यार्थी आणि सहशिक्षकांनी ठरवली होती. तशी कुणकुण वसुधाताईंना आधीच लागली होती. त्यांनी त्यांच्या एका शिक्षक मैत्रिणीला बोलावून,” कार्यक्रम तुम्ही ठरवा पण फक्त केक कापणे नको.” असं आवर्जून सांगितले. तसा सगळ्यांचा विरस झाला...
Continue reading...Watsapp लग्न
गिरीजाच्या मुलीचं म्हणजे गार्गी चं लग्न अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलं होतं. खरेदी चालूच होती. कार्यालय, केटरर्स ठरवुन झाले होते. मेन्यू ठरवण्या साठी त्यांचा सारखा फोन येत होता पण सगळ्यांनी एकत्र मिळून ठरवणं जमत नव्हतं. गिरीजा त्याला रोज काहीतरी कारण देउन टाळत होती. पत्रिका वाटण्याचं सगळ्यात वेळकाढू आणि मोठं काम मात्र व्हॉट्सअँप मुळे बरंच सोपं झालं होतं. गिरीश आणि गिरीजा दोघांनी मिळून (अगदी ...
Continue reading...मनस्वी
शशीकांतराव आणि सीमा ताई, एक मुलगा आणि एक मुलगी सुखी मध्यम वर्गीय चौकोनी कुटुंब. मुलं यथावकाश मोठी झाली आणि लग्न होऊन मार्गी लागलेली. सीमाताई आणि शशीकांतराव मुलगा आणि सून यांच्या सोबत आनंदाने एकत्र राहत होते. शक्य तेवढी मदत सीमाताई सुनेला करत असत तीला सुद्धा त्याची जाणीव असे. सगळंच नीट चाललेलं अचानक दोन दिवसांच्या आजाराचं निमित्त होऊन सीमाताई गेल्या आणि घर जणू एकदमच...
Continue reading...गाठोडं
कीर्ती एका मध्यमवर्गीय कुटुंबात शिकून मोठी झाली होती. पदवी प्राप्त केल्यानंतर रीतीप्रमाणे एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील केवल शी तिचं लग्न झालं. दोन गोजिरवाणी मुलं आणि मोठ्या पदावर कार्यरत असणारा केवल त्यामुळे घरात तशी आर्थिक सुबत्ता होती. कीर्ती सुद्धा गृहकृत्यदक्ष गृहिणी होती. मुळातच मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने काटकसरीने संसार करण्यावर तीचा भर असायचा. माहेरी घर लहान असल्यामुळे वस्तू, कपडे नीटनेटकेपणाने ठेवण्याचं वळण अंगात भिनलेलं होतं....
Continue reading...उजाळा
अभि आर्किटेक्ट झाला. याचं सगळ्या वाड्याला कौतुक वाटलं. अभि म्हणजे अभिजित केळकर, वाड्याचे मालक वामनराव केळकरांचा मुलगा. वामनराव स्वतः इंजिनिअर आणि आता मुलगा आर्किटेक्ट म्हणजे दुधात साखर. आता नक्की वाडा जाणार आणि टॉवर होणार अशी कुजबूज सुरू झाली होती. हो कुजबूजच कारण माई असे पर्यंत वाडा पडेलच अशी खात्री नव्हती. माई म्हणजे अभिची आजी. मुलगा इंजिनिअर झाला तरी त्यांनी वाड्याला धक्का लागू दिला नव्हता...
Continue reading...उपरती
माधवचं वय तसं फार नव्हतं. पन्नाशी अजून गाठली नव्हती तरीही गुडघेदुखीने हैराण झालेला होता. बरेच उपाय केले होते आणि चालूही होते. कधी फरक पडे तर कधी येरे माझ्या मागल्या. दोन तीन वर्षांपासून हे सुरू होतं. Knee transplant चे ऑपरेशन करून घेणं हा शेवटचा उपाय आहे आणि एवढ्या लहान वयात नको म्हणून बाकीच्या गोष्टी करणं सुरू होतं. माधवी म्हणजे माधव ची पत्नी मात्र...
Continue reading...
