“अरे भाई कितनी बार बोला तुझे इमोशन मंगता है इमोशन। पब्लिक रोनी चाहिए समझा क्या? कुछ भी स्टोरी बना, गरीबी, बिमारी कुछ भी चलेगा। लोगोंके आंखों में आसूं आने चाहिए बस।” “सर लेकिन यह प्रोग्राम तो गाने का है ना? और सब अच्छा गानेवाले है……” “अब तू मुझे सिखाएगा की ये कोनसा प्रोग्राम है? ये मेरा खुद का शो है समझा मैंने तुम्हें असिस्टेंट रखा...
Continue reading...Uncategorized
निवृत्तीनाथ
त्रंबकेश्वर असे पवित्र क्षेत्र| प्रसिद्ध ज्योतिर्लिंग तीर्थ| निवृत्तीनाथ समाधिस्थ तेथ| नवनाथ गुरू गहीनी लाभला| नमस्कार त्या शिष्योत्तमाला||
Continue reading...प्रक्रिया
कॉलेज मध्ये सुवर्ण पदक मिळवलेल्या साक्षीचे सगळीकडेच कौतुक होत होतं आणि ते तसं अपेक्षित होतं. कौतुक सोहळे संपले आणि रोजचं आयुष्य सुरु झालं. पुढे शिकण्याआधी थोडा अनुभव घेण्यासाठी काम शोधणं सुरू झालं. इथे मात्र वास्तवाचे चटके बसू लागले. जिथे काम करायला आवडेल म्हणून अर्ज टाकले जात तिथे अनुभवी व्यक्ती हवी होती आणि जिथून कॉल येत होते तिथे अगदीच नगण्य किंवा वेगळ्या कामाची अपेक्षा होती. मुळातच...
Continue reading...सल
प्रतिक्षाला गाडी काढताना बघून विमला काकूंनी तिला हाक मारली आणि जरा वेळ असेल तर वर येतेस का? असं विचारताच तिने लगेच हेल्मेट काढून परत डिकीत ठेवले आणि वर आली तोवर पहिल्या मजल्यावरील विमला काकूंनी दार उघडून ठेवले होते. “प्रतिक्षा अगं यावेळी परस्पर न भेटता निघालीस काही गडबड आहे का? पुन्हा उद्याही तू येत नाहीस हल्ली गौरी विसर्जन करायला मग भेट होत नाही लवकर म्हणून हाक...
Continue reading...सावकाराची कहाणी
आटपाट नगर होतं, त्यात सगळ्या अठरा पगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. जमीनदार तोऱ्यात होते, कष्टकरी, कामगार कामात होते. गरीब ब्राह्मण पुजा पाठ आणि धर्माच्या गोष्टी शिकवत होते. एकूण सगळे आपल्या विश्वात सुखी -समाधानी होते. लोक पापभीरू होते, चांगले -वाईट, पापपुण्य मानत होते, सगेसोयरे जाणत होते. एकमेकांच्या प्रेमात, दुःखात, सुखात आपलं सुखदुःख वाटत होते. जमेल तसं आणि परवडेल इतकं वाटंत होते. थोडक्यात काय तर कासार...
Continue reading...श्रीमंती
प्रिया घरात आली ते जरा तणतणतणच, ” का बोलावले त्यांनी? ही काय पद्धत आहे वागण्याची? मित्र म्हणून बोलावलं होतं की स्वतःच्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायला?” “हो हो प्रिया जरा शांत हो! मलाही नाही आवडलं त्यांचं वागणं पण तू किती चिडते आहेस? आणि मी म्हणतो की तू हे खूप पर्सनली का घेतेस सोड ना.” प्रत्युष तीला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. झालं असं होतं की सीमा आणि...
Continue reading...ते आले नाहीत म्हणून ……….
मीना नुकतीच आते बहिणीच्या लग्नाला जाऊन आली होती आणि साडी, दागिने आवरत होती. मनाने मात्र अजून ती तिथेच होती. सगळे माहेर भेटल्याने ती अगदी आनंदात होती. भेटलेल्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा आठवत होती. सगळे भेटले पण काकू नाही, नेहमी प्रमाणे संदेश आणि सुगंधा मात्र आले होते. काकूची आठवण आली आणि ती विचारात हरवली, “माझी काकू गेल्या कित्येक वर्षांत कोणत्याही कार्यक्रमाला गेली असल्याचे किंवा नातेवाईकांच्या लग्नकार्यात भेटल्याचे...
Continue reading...रानफुल
तो चंद्र होता आणि ती रानफुल. रानफुलाने चंद्रावर प्रेम करायचं नसतं हे कळण्याचं वयही नव्हतं तेंव्हापासून ती त्याच्यावर प्रेम करत होती. आपलं प्रेम त्याला समजतंय की नाही हा विचार सुद्धा तिने कधी केलाच नाही. त्याला चंद्र म्हणण्याचं कारण सुद्धा तसेच होते, तो खूप उंचावर होता आणि खरंच पंधरा दिवसांनी एकदा कधीतरी दिसायचा आणि ती खूप खाली अगदी जमीनीवर राहायची म्हणून रानफुल. ही आईबरोबर चाळीत राहायची...
Continue reading...समर्थ
सई एक अवखळ सहा सात वर्षांची पोर, रोज गंगा घाटावर आई सोबत धुणे धुण्यासाठी यायची आणि सवंगड्यासोबत खेळत असायची. कधी पाण्यात तर कधी मातीत आणि कधीतरी आईच्या भोवती घुटमळत राहायची. तिचा आणि तिच्या आई बरोबर असणाऱ्या सगळ्याच बायकांचा हा दिनक्रम ठरलेला होता. यात लक्षणीय असा काही बदल तिला कळायला लागलं तेंव्हापासून तरी झालेला नव्हता पण आताशा काही दिवसांपासून एक कोणीतरी मुलगा रोज पाण्यात एका पायावर...
Continue reading...अडगळीची खोली
माझ्या मामाच्या गावी आणि काकांच्या गावी घरात एक अडगळीची खोली होती. अंधारी खोली म्हणून तीचा अनेकवेळा घरातल्या सदस्यांकडून उल्लेख केला जात असे. आम्ही भावंडं सुट्टीत एकत्र जमलो की या खोलीतून बऱ्याच ठेवणीतल्या गोष्टी बाहेर येत. अगदी वाळवणाच्या(पापड, कुरडया) लोणची,मेथांबा, साखरांबा मोरावळा या पदार्थांपासून मोठ्या पितळी पातेल्यात पर्यंत आणि जास्तीच्या अंथरूण पांघरूणा पर्यंत अगदी बरचसं सामान या अंधाऱ्या खोलीत ठेवलेले असे ते आम्हा मुलानातवंडांच्या मदतीने आई,...
Continue reading...
