“आई आई बघ ना गं दादानं माझं चॉकलेट खाल्लं आणि मी तुला सांगतेय म्हणून मला मारतोय……” पाच वर्षांची श्रावणी दादाच्या विरोधात आपल्या आईकडे तक्रार घेऊन रडत रडतच आली. आता आपली आई दादाला चांगलं ठोकून काढेल आणि आपल्याला दुसरं चोकलेट मिळेल असं तिला...
Continue reading...Uncategorized
प्रेम म्हणजे काय
कधी कधी खरंच वाटतं प्रेम म्हणजे नेमकं काय असतं 🤔 गुलाबाचे फुल घेऊन मागं मागं फिरणं असतं की हातात हात घालून बागेत बसणं असतं ? प्रेम म्हणजे एक ‘डील’ असतं सगळ्या नात्यांमध्ये ते अलिखित असतं आई-वडीलांचं आणि मुलांचं प्रेम नैसर्गिक असतं अपेक्षांचं ओझं तिथे नसतं. पतिपत्नींचं प्रेम तसं जरा दुर्लक्षित असतं ते व्यक्त करायला समाजाचं भान ठेवावं लागतं कुटुंबातील लोक काय म्हणतील ? मित्र...
Continue reading...देवभोळी
शांता एका मध्यम वर्गीय कुटुंबातील स्त्री. लहानपणापासून घरांत संस्कारांचा पगडा होता. चांगले -वाईट, पापपुण्य या संकल्पना मनावर बिंबवल्या गेल्या होत्या. त्यामुळे असेल कदाचित पण कोणतीही गोष्ट करताना, हे बरोबर आहे का नाही, चांगले असेल ना, काही चुकीचे तर नसेल ना?? इत्यादी गोष्टींचा विचार करून ती सगळं करत असे. यामुळे काही बिघडत होतं असं नाही पण नवीन पिढी तीची खिल्ली उडवायला लागली होती....
Continue reading...हास्यास्पद
अगदी हास्यास्पद वाटलं तरी वेड्यासारखं हसणं हे आरोग्यदायी आहे. ताणतणाव दूर करण्याचं सामर्थ्य या वेड्या हसण्यात आहे. ‘लोक काय म्हणतील?’ या भीतीने माणूस आपलं हसणं म्हणजे लहानपणी हसायचा तसं वेड्यासारखं हसणं सोईस्कर विसरला आहे. हसणं किती प्रकारचं असतं असं जर कोणाला विचारलं तर मनमोकळेपणाने, खळखळून, गडगडाटी, दिलखुलास, निर्मळ असे आणखी कितीतरी प्रकार ऐकायला मिळतील. वेड्यासारखं हसणं हा सुद्धा एक प्रकार...
Continue reading...वरण-भात
” वरण भात” खाणारी व्यक्ती म्हणजे मुळमुळीत आणि साजुक तुपाचे खाणारी व्यक्ती ज्याला तिखट, मसालेदार आणि प्रामुख्याने नॉनव्हेज चे वावडे असणारी, असा एक मोठा गैरसमज पसरलेला आहे. अजून एक मोठा गैरसमज असा की अशी माणसं अहिंसावादी, शांतता प्रिय असतात. या सगळ्या गोष्टींचा अपवाद म्हणजे स्वतः ‘श्रीकृष्ण’. अर्थात हे सगळं आत्ता लिहीण्याचे कारण म्हणजे या सगळ्या मुळे बदनाम होत असलेला ‘वरण भात’. ...
Continue reading...मनात माझ्या
आता माझ्या या ब्लॉग चे वाचक कमी झाले आहेत. म्हणजे आधी खूप होते असं काही नाही. पण आता अगदीच २० च्या आत आलेत. का ते माहीत नाही पण जिथे जिथे छान प्रतिसाद मिळत होता त्या प्रत्येक ठिकाणी काही ना काही तरी कारणाने माझ्या लिखाणाचा उत्साह कमी होईल असे घडते आहे. काही सदरं बंद झाली, काही मासिकात छापून येत होते ती मासिकं बंद पडली,...
Continue reading...संत निवृत्तीनाथ
त्र्यंबकेश्वर असे पवित्र क्षेत्र | जेथे वसतसे शिवभोले नाथ | नवनाथ गुरू गहिनी जयांचे| समाधीस्थ तेथे शिष्य निवृत्ती तयांचे| अखंड दर्शन घडे ब्रह्म गिरीला | नमस्कार माझा त्या शिष्योत्तमाला...
Continue reading...गर्दीत हरवण्याची भीती
आपल्या दोन महिन्यांच्या बाळाकडे बघत बसलेली प्रज्ञा विचारांच्या तंद्रीत होती. “काय गं अशी काय बघत बसलीस? ” सासुबाईंच्या प्रश्नाने ती भानावर आली, पण तिच्या स्वरातुन मनातल्या भावना यशोमती बाईंना जाणवल्या. ” आई अजुन किती लहान आहे हे पिल्लू? बाहेर किती अन् काय काय चाललंय याची जाणीव नसते ना? ” बाळांतपणासाठी प्रज्ञा ने रजा मागितली आणि त्यानंतर तीला नोकरी सोडावी लागली होती...
Continue reading...मनाचिया घावावरी मनाची फुंकर
लिखाण करायला सुद्धा आज काही सुचत नव्हते. तशी ईरा काही फार मोठी लेखिका होती असं नाही पण गृहीणी म्हणून घरातल्या प्रत्येकाशी ती कनेक्ट होती, त्यामुळे आपोआपच सगळ्यांना ती छान वाचू शकत होती. प्रत्येकालाच कागदावर व्यक्त होता येत नसतं ते ईराला अगदी सहज जमत असे. म्हणुनच ती लिखाण करू शके. लोकांना तिचं लिखाण आवडतही होतं. तश्या प्रतिक्रियांमधून तीच्या पर्यंत ते पोहोचत...
Continue reading...गौराई
संध्या… संध्या, आई बोलवत होती आणि संध्या आले आले म्हणून घाईघाईने हातातील काम संपवत होती. कधी एकदा हा लॅपटॉप बंद करून आईला मदतीला जाते आहे असे संध्याला झाले होते. Graduation संपल्यावर एक वर्षाची internship मिळाली होती आणि घरूनच कामं करायची होती म्हणून संध्या ने अनुभव घेण्यासाठी ती एक्सेप्ट केली होती. श्रावण संपून भाद्रपद सुरू झाला आणि घरी गणपती...
Continue reading...
