नवलाई

        मनू ने जरा तणतणतच घरात प्रवेश केला.  सासर घराजवळच असल्याने बरेचदा ऑफिसला जाताना मनू आईकडे येऊन जात असे. आजसुद्धा नेहमी प्रमाणे ती आईच्या घरी आली होती पण चिडचिड करत जोरात बेल बडवत. तसा मनूच्या स्वभाव शांत होता असं नाही पण ती समंजस होती विनाकारण चिडणं हा तिचा स्वभाव नव्हता आणि त्यातून सासरी गेल्यापासून तर ती फार जबाबदारीने वागत होती. म्हणूनच आजचा...

Continue reading...

मंगळागौर

    ऐंशी वर्षांच्या उमाबाई नातसुनेच्या मंगळागौरीच्या पुजेसाठी वाती वळत होत्या. नाही म्हणायला एवढे एकच काम त्यांच्या वाट्याला आलं होतं. तसं बरोबरच होतं म्हणा, आता या वयात त्यांच्याकडून कोण काय काम करून घेणार होतं. राधाकाकू म्हणजे त्यांच्या सुनबाई, त्यांची लगबग सुरू होती पण किरकोळच कामांची म्हणजे फुले, रांगोळी आणि पुजेची तयारी वैगरे. कारण सगळ्या बाकीच्या गोष्टींचे  कंत्राट (contract) दिले होते. त्यामुळे सगळं कसं सुटसुटीत होतं....

Continue reading...

अट्टाहास

       सतत भुणभुण करणाऱ्या रेवाला आपल्या बहिणीचा, पूजाचा हेवा वाटायचा. रेवा आणि पूजा दोघी बहिणी. रेवा पूजा पेक्षा दोन वर्षांनी मोठी. पाठोपाठ एका वर्षात दोघींची लग्न झाली. योगायोगाने एकाच शहरात आणि माहेरच्या जवळपास त्यामुळे दोघीजणी आई बाबांकडे लक्ष देत. रेवा नोकरी करायची आणि पूजा हाउसवाईफ. चांगला पगार मिळत असुनही आणि घरी सगळं छान असुनही सतत तक्रारी करणं हा रेवाचा स्वभाव होता. याउलट पूजा...

Continue reading...

सासुरवाशीण

     मैथिलीच्या मुलीचं लग्न ठरलं. सुहानी मैथिली आणि निखिलची एकुलती एक कन्या.  मैथिलीच्या माहेरी दोन भाऊ-भावजया आणि त्यांची प्रत्येकी दोन मुले तसंच सासरी तीन नणंदा आणि एक दीर त्यांची मुले, असा भरापूरा परीवार आणि सुहानी. सुरवातीपासूनच निखिल आणि मैथिली सगळ्यांशी जरा अंतर ठेवूनच वागले त्यामुळे सुहानी सुद्धा तशी अलिप्तच होती काका काकू, मामा मामी यांच्या सोबत जेवढ्यास तेवढं बोलणं. काही कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटणं. खरंतर...

Continue reading...

पश्चात्ताप

    “आयुष्य हे क्षणभंगुर असते.” असं म्हणणाऱ्या सविताच्या सासूबाई ८८ वर्ष जगल्या. अर्थातच ते आपल्या हातात नाही आणि वरील वाक्य हे शब्दशः घ्यायचं नसतं.           रूक्मिणी काकू म्हणजेच सविताच्या सासूबाई पतीच्या निधनानंतर मुलगा आणि सून यांच्या सोबत  राहात होत्या. विठ्ठलपंत होते तोपर्यंत आपल्या जुन्या घरीच राहाणं त्यांनी पसंत केले होते. तसं जुनं घर मोठं असलं तरी सोयीचे नव्हते. म्हणूनच मग मुलाला...

Continue reading...

गोष्ट मिलिंद मीताची

     मिलिंद आजकाल सगळ्या छोट्यामोठ्या कार्यक्रमात सहभागी होतो, असं जवळपास सगळ्याच नातलगांनी आणि मित्रांनी ओबझर्व्ह केलं होतं. मिलिंद तसा रिझर्व्ह आणि शिष्ट म्हणून परिचित होता. हुशार,देखणा, भरपूर पगार, छान मुलं या सगळ्या गोष्टींमुळे जास्तच attitude दाखवायचा. कोणत्याही आणि कोणाच्याही कार्यक्रमाला उपस्थित न राहाणं हा त्याचाच एक भाग होता. त्याची पत्नी मीता मात्र आवर्जून यायची,सगळ्यांशी बोलायची नवरा बिझी आहे म्हणून सांभाळून घ्यायची. मीताला मात्र मनापासून ...

Continue reading...

माझं जगून झालंय

     गेले काही दिवस मीराच्या मनात विचारांचे कल्लोळ उठले होते, “माझं जगून झालंय” हो खरंच. आई म्हणून, पत्नी म्हणून,सून म्हणून, माझी कर्तव्य कदाचित कधीच संपणार नाहीत. नाही म्हणायला सासू होणं तेवढं बाकी आहे. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आयुष्याची ४६ वर्ष संपली. लौकिक अर्थाने हे काही मरायचं वैगरे वय नाही आणि मी खूप दुःखी आहे, निराशेने ग्रस्त आहे असंही मुळीच नाही. मग मी जगून झालंय...

Continue reading...

जन्म आणि मृत्यू

     जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी आपल्या हातात नाहीत हे सर्व ज्ञात आहे. मृत्यू कोणाला, कधी, कुठे आणि कसा येईल हे निश्चित असलं तरी माहीत नसतं. अर्थात हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे  प्रसिद्ध गायक “K K” चा चटका लावणारा झालेला मृत्यू. या आधीही अनेक लोकप्रिय कलाकार,अभिनेते, अभिनेत्री,गायक असे कोणी ना कोणी हे जग सोडून अचानक आपल्यातून निघून गेले आहेत. अगदी रोजच्या जीवनात सुद्धा आसपासच्या...

Continue reading...

आठवणी मनातल्या

   पुण्यातल्या पर्वतीच्या जवळच्या चाळीत माझे लहानपण  गेले. चाळीत आठ घरं लागून आणि एकमेकांत मिसळून असायची. सगळी मुलंमुली साधारण समवयस्क. बायकाही सगळ्या बरोबरीच्या आणि महत्वाचे म्हणजे आर्थिक स्थिती सुद्धा एक सारखीच त्यामुळे कमीजास्त,लहानमोठे, गरीब-श्रीमंत असले भेदभाव नव्हते. घरं देखील अगदी मोजक्या दोन खोल्या आणि स्वतंत्र टॉयलेट बाथरुम, ही चैन होती त्या काळात. हवं तेंव्हा चाळीत कोणाकडेही आम्ही खेळत असू. दुपारनंतर संध्याकाळ होण्याआधी थोडावेळ बायका एकमेकींकडे...

Continue reading...

कढवलेलं तूप

     लोणकढं तूप म्हणजे काय ग आई? असं लहान मुलांनी विचारणं हे समजू शकतो पण मोठ्या मुलीने किंवा एखाद्या मोठ्या स्त्री ने हा प्रश्न विचारवा हे न पटणारे आहे. दुर्दैवाने आज मुलामुलींना घरचं तूप कसं बनवतात हे माहीत नसते हे मात्र खरं आहे. आधी लहान म्हणून आणि नंतर कॉलेज मग वेगवेगळ्या परीक्षा आणि महत्वाचे म्हणजे करियर, यामुळे घरातील साधी साधी कामं करायला जिथं वेळ...

Continue reading...