माझा देश

           ” देश हा देव असे माझा                 अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा…”   “भारत माता की जय,वंदे मातरम”  ही गर्जना निर्भीड पणे करत क्रांतीकारकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. ह्याला काल  ७५ वर्ष पूर्ण झाली. आजही आपले जवान सीमेवर तैनात आहेत आणि प्राणांची पर्वा न करता आपल्याला सुरक्षित ठेवत आहेत, ते देशाला देव मानण्याच्या...

Continue reading...

अनुभूति

            ” भेटि लागी जीवा लागलिसे आस,                 पाहे रात्रं दिवस वाट तुझी…”    संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा हा अभंग, देव प्रत्यक्ष भेटला आणि आता तो वारंवार भेटत राहावा अशी ओढ ह्या अभंगात जाणवते. पण सामान्य माणसाला हा देव इतक्या सहज भेटत असेल?? आणि समजा तो भेटला तर तो झेपेल?? संतांची योग्यता फार...

Continue reading...

आनंदाचा ठेवा

        “जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा..”       माणसाला वेड लागणं हे खरेतर मानसिक आरोग्य बिघडण्याचे लक्षण आहे, पण हे वेड सामान्य माणसांमध्ये अधुनमधून दिसत असते. आपल्या नेहेमीच्या वर्तना पेक्षा काहीतरी विपरीत वर्तन  करणे म्हणजे वेड्यासारखे वागणे. प्रत्येक माणसात एक लहान मुल लपलेले असते आणि मधुनच ते बालपण डोकावते पण समाजाचे भान जपण्याच्या नादात प्रत्येकजण त्याला आत दाबतो.     ...

Continue reading...

“गुंतता हृदय हे”

       ” या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या….”      माणसाचं हृदय हि फार विलक्षण गोष्ट आहे. गुंतागुतीचे तर आहेच परंतु मेंदुशी निगडीत आहे.असे म्हणले तर वावगं ठरणार नाही. कारण मेंदू मध्ये होणाऱ्या भावनीक हिंदोळ्यांचे थेट परिणाम हृदयावर होतात. बरं हे हृदय म्हणजेच सामान्य लोकांसाठी ‘मन’, कुठे, कधी आणि कसे गुंतेल हे ठरवता येत नाही.  आपल्या हातात नसतानाही मग आपल्याला त्याचे परिणाम...

Continue reading...

प्रेमाची ताकद

      ” लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती..”      प्रेम, प्रीती खरंच खूप छान आणि मोठी संकल्पना आहे. लाखो चुका पोटात घेण्याची ताकद आहे. आई-वडील,पति-पत्नी, भाऊ-बहीण अगदी मैत्री घ्या नात्यात सुद्धा प्रेम असतेच. राधा कृष्ण, कृष्ण सुदामा हि प्रेमाची आणि मित्र प्रेमाची दोन्ही ची आदर्श उदाहरणे आहेत. कृष्ण आपला कधीच होणार नाही हे माहित असूनही त्याची आठवण आयुष्य भर उराशी बाळगून...

Continue reading...

आनंदाचा ठेवा

           “देहाची तिजोरी,भक्तीचाच ठेवा,             उघड दार देवा आता उघड दार देवा..”       आपल्या देहाचे म्हणजेच शरीराचे त्याहीपेक्षा अंत:करणाचे दार देवला उघडायला सांगितले आहे ते का??  भक्तीचा ठेवा म्हणजे समाधान आणि संयम. ह्या दोन्ही फार मोठ्या गोष्टी आहेत. ऐकायला सोप्या वाटल्या तरी अनुभवणं, त्या आमलात आणणं कठीण आहे.  एखाद्या दाराबाहेर दार वाजवुन ते उघडे...

Continue reading...

देवाचे दार

          “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी,               तेणे मुक्ती चारी साधियेल्या.”       मुक्ती म्हणजे काय? आणि खरंच देवाच्या दारी क्षणभर उभे राहून ती मिळते का?? हा आध्यात्माचा विषय आहे.  सर्व सामान्य लोकांसाठी मात्र देवाकडून प्रेरणा हवी असते. आपल्या विवंचनांची उत्तरे हवी असतात. प्रत्येक व्यक्तीची समस्या वेगळी असते.  मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तर आर्थिक परिस्थिती...

Continue reading...

मनात माझ्या

              “मनाचिये घावावरी मनाची फुंकर.” माणसाचे मन हे खुप शक्तीशाली असते. फक्त ती ताकद ओळखता यायला हवी.  रामदास स्वामी यांनी हेच प्रभावी मन कसं जाणावं आणि त्याला ताब्यात कसं ठेवावं हे मनाच्या श्लोकात सांगितले आहे, ते कालातीत आहेत.        मन हा न दिसणारा पण जाणवणार एक महत्त्वाचा भाग आहे. हे आता स्पष्ट झाले आहे. हे मन इतकं...

Continue reading...

ऋणानुबंध

           “ऋणानुबंधाच्या कुठून पडल्या गाठी,          भेटीत तृष्टता मोठी.”         खरंतर आपल्या आयुष्यात आपले रक्ताचे नातेवाईक आपण निवडत नाही ते असतात पण मित्र निवडता येतात. ह्या निवडता येणाऱ्या मित्रां शिवाय सुद्धा अनेक जण आपल्या आयुष्यात येतात. काही कामानिमित्त, बाहेरगावी जाताना प्रवासात, रोजच्या जीवनात सुद्धा अनेक कारणांमुळे कितीतरी लोक भेटतात. प्रत्येकाशी आपले संबंध जुळतातच असे नाही....

Continue reading...

आठवणीतले पुणे

                                                               माझे  बालपण          “माहेर” हा स्री मनातला जिव्हाळ्याचा आणि हळवा कोपरा, अनेक आठवणी आणि संस्कारांची शिदोरी बरोबर घेऊन पुण्यातले माझे माहेर सोडून मी सासरी नाशिक ला आले.        ...

Continue reading...