श्रीरंग

        “केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवाा,            तुझ्या सारखा तूच देवा,                 तुला कुणाचा नाही हेवा..”       कृष्ण जन्माष्टमी हा एक उत्सह, आनंद वाढवणारा सण आहे. कंसा सारख्या अत्याचारी राज्यकर्त्याचे निर्दालन करण्यासाठी कृष्णाने जन्म घेतला. संपूर्ण राज्यात एक प्रकारची मरगळ आलेली होती. आपल्याच गायींच्या दुधा-तुपावर आपलाच हक्क नसावा हा...

Continue reading...

मेंदीच्या पानांवर

     “मेंदीच्या पानावर मन अजून झुलतंय ग             जाईच्या पाकळ्यांस दव अजून सलतंय ग…”    स्त्री अगदी कोणत्याही वयातली असो मेंदी म्हणलं की तिचं मन हळुवार होणार आणि जुन्या आठवणींत अर्थात माहेरच्या आठवणींमध्ये जास्त रमणार. माहेर हा प्रत्येक स्त्री च्या मनातला हळवा कोपरा असतो. त्या कोपऱ्यात ती स्त्री कायमच एक अल्लड,लडीवाळ मुलगी असते. तिचं एक कोरं मन त्या कोपऱ्यात ती...

Continue reading...

सुखी माणसाचा सदरा

     ” मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?           काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं!…”    सुखाच्या कल्पनेने सुद्धा मनाला गुदगुल्या होतात. नेमकं हे सुख कसं, कुठं आणि कधी मिळतं हे मात्र सांगता येत नाही.        सुख ही एक महत्वाकांक्षी संकल्पना आहे आणि प्रत्येकजण ते मिळवण्यासाठी धडपडतो आहे. बरेचदा सुख हे ऐहीक असतं तर बरेचदा...

Continue reading...

चिंतातूर जंतू

     “का चिंता करिसी प्राण्या का चिंता करिसी          नयनी पाणी हृदयी काशी का चिंता करिसी…”     मनुष्य प्राण्याचे दुसरे नावच चिंतातूर जंतू आहे, असे म्हणले तर अतिशयोक्ती होणार नाही. सर्व प्राणीमात्रात मानव हा एकमेव प्राणी विचार करू शकतो हे वरदान आहे तर चिंता करू शकतो हा शाप आहे. कारण विचारांनी प्रगती होते तर चिंता रोग देते. चिंता हीच मुळात...

Continue reading...

“पराधीन आहे जगती…”

             “पराधीन आहे जगती                          पुत्र मानवाचा….”       श्री हरी विष्णूं युगानुयुगे मानवी रूपांत अवनीवरती अवतरीत होत असतात. मनुष्य रूप धारण केल्यानंतर माणूस बनुन राहाणं हे तितकेसे सोपे नाही हे त्या विधात्याने सुद्धा कदाचित मान्य केले असेल. स्वतःच स्वतःच्या नियमांचे पालन करून प्रत्येक रूपांत एक आदर्श  देवांनी...

Continue reading...

यशोगाथा

         “जीवन गाणे गातच राहावे,                 झाले गेले विसरून जावे,                         पुढे पुढे चालावे…”      रोजच्या जीवनात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या क्षणी स्वतःला हे सांगवेच लागले असते. हेही दिवस जाणार आहेत. यशाच्या शिखरावर असलेल्या व्यक्तिच्या प्रत्येक गोष्टींची चर्चा होते, प्रसिद्धी मिळते. त्यांच्या Struggle चे...

Continue reading...

पत्रास कारण की

     “सप्रेम नमस्कार, विनंती विशेष!       तुझ्यावाचुन मला कटवेना सखे ग परदेश…” आजच्या काळात काहीसे विसरले गेलेले हे गाणे आणि पत्र लिखाण, राखी पौर्णिमेच्या निमित्ताने आठवण झाली ती ह्या पत्र लिखाणाची. अर्थात वरील पत्र हे एका प्रेमीयुगुलांचे आहे. त्या गाण्याच्या निमित्ताने का होईना पत्रांची आठवण आली.  पुर्वी लांब असलेल्या आपल्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचे एकमेव साधन हे पत्र असायचे. पिवळ्या रंगाचे पोस्टकार्ड कमी...

Continue reading...

‘आईपण ‘

          “आई सारखे दैवत साऱ्या                   जगतावर नाही ….”     आई ची थोरवी माहीत नाही असा माणूस शोधून सापडणे अशक्य आहे.        प्रत्येक स्त्री मध्ये एक आई असतेच, त्याकरता तीने  स्वतः आई असलेच पाहिजे असे नाही. कोणत्याही वयाची मुलगी अगदी आपल्या आईचीही आई होऊच शकते. वेळ प्रसंग पाहून जबाबदारी स्वतःवर घेण्याचा...

Continue reading...

प्रभाव

      ” कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था …..”     जन्म झाला की आपण मुलगा आहोत की मुलगी हे कळण्याचा सुद्धा  प्रश्न येत नाही, आणि गरजही वाटत नाही. हळूहळू मी मुलगा किंवा मुलगी आहे हे समजायला लागते मग आपले हक्क, मागण्या हट्ट करून, प्रसंगी रडून कशा पद्धतीने पूर्ण करून घ्यायच्या ते कळायला लागते. ह्या गोष्टी शिकवायला लागत नाहीत. कारण ‘स्व’ जागा होत असतो....

Continue reading...

रंग माझा वेगळा

      ” रंगुनी रंगात ‌‌‍‌‌‌‌‌‌‌‌‌‌साऱ्या,रंग माझा वेगळा..”      संपूर्ण विश्व हे रंगात रंगलेले आहे. अनेक रंग आणि त्यांच्या अनेक छटा. कित्येकदा रंगांची नावे सुद्धा माहित नसतात. हिरवळीचा हिरवेपणा सुद्धा खूप प्रकारचा असतो. हे प्रत्यक्ष पाहिले की मग जाणवते. हिरवी झाडे कधी पोपटी तर कधी काळपट हिरवट आणि कधीकधी तर कोवळी पाने चक्क लालसर दिसतात. हे फक्त झाडांच्या बाबतीत असते असे नाही, निसर्गाच्या...

Continue reading...