” सदचार हा थोर सांडूं नये तो| जनीं तोचि तो मानवी धन्य होतो||” माणूस सध्या सदाचारापेक्षा प्रोटोकॉल मध्ये जास्त अडकलाय. शिष्टाचार पाळले पाहिजेतच पण त्यात आपलेपणा हरवत नाही हेही बघितले जायला हवे. Sorry, Thanks म्हणणं महत्वाचे आहेच पण हक्काने आपल्या माणसांकडून काही करून घेतले तर व्यक्त केल्या जाणाऱ्या कृतज्ञतेत शब्दांपेक्षा डोळ्यांतील...
Continue reading...पदर
“पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसवं शालू नवा…” ‘स्त्री’ ची एकाच जन्मात अनेक रूपं दिसतात. नवरात्रिच्या नवदुर्गां प्रमाणे ती अनेक रूपं घेत असते. तसे तर पुरुष सुद्धा वेगवेगळी नाती निभावतो पण स्त्री अनेक भूमिका निभावत असते. तिच्या प्रत्येक भूमिकेला अनेक पदर असतात. एकाचवेळी ती खूप काही असते मुलगी, बहीण,नात,नणंद, वहिनी,जाऊ,आई,आजी पत्नी आणि मैत्रिण. सगळ्या...
Continue reading...गोतावळा
“भलेबुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू ह्या वळणावर ह्या वळणावर….” जगात कोणाचेच कोणाही वाचुन काहीही अडत नाही, असं नसतंच खरंतर पण क्षणभरच असं मानलं तरी प्रत्यक्षात ते तसं असतं नाही. माणूस कितीही स्वावलंबी असण्याचा बहाणा करीत असला तरी कधी ना कधी कोणाची तरी गरज ही लागतेच....
Continue reading...प्रार्थना
“हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे…” सध्या कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या आणि हातावर पोट असणाऱ्यांना मदत केली जात आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. पण एरवी सुद्धा अनाथाश्रम, वृद्धाश्रम इत्यादी ठिकाणी मदत करणारी बरीच मंडळ, समाजसेवी संस्था आहेत. प्रत्येक गरजुंपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करणारे लोक हे गरजूंना...
Continue reading...🌺गूरूकृपा🌺
“गूरू परमात्मा परेशु| ऐसा ज्याचा दृढ विश्वासु|” येताजाता काही ना काही शिकवत राहण्याची सवय बऱ्याच जणांना असते पण ते सगळेच गूरू असतं नाहीत. खरंतर ‘गूरू’ भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ते भेटले तरी त्यांना ओळखणं, खूण पटणं हे सहज नाही. त्यासाठी श्रद्धा, विश्वास दृढ असवा लागतो किंबहूना गूरूभेटीची ओढ दृढ...
Continue reading...स्वप्न
“स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा गोडी अपूर्णतेची लाविल वेड जीवा……” स्वप्न पाहण्याचा हक्क जरी सगळ्यांना असला तरी स्वप्न कोणते पडेल हे आपल्या हातात नाही. झोपेत पाहिलेली स्वप्न ही पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा नसते आणि ती सुसंबद्ध असतातच असं नाही. जागेपणी स्वप्न...
Continue reading...पाऊस
“ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना..” निसर्गाच्या सहवासात राहून किंबहूना निसर्गाचाच एक भाग असून थेट ढगांना तनमन भिजण्याची विनंती वजा आज्ञा करण्या इतपत माणूस निसर्गाला हक्काचे मानतो. एकीकडे विज्ञान-तंत्रज्ञान, यंत्र, कंप्युटर च्या विश्वात हरवलेल्या मानवी मनाला आजही ह्या घनांचे बरसणे आकर्षित करते. पहिल्या पावसात भिजणं, पुराच्या पाण्यात उड्या मारणं, साठलेल्या पाण्यात होड्या...
Continue reading...निसर्गाच्या सान्निध्यात
” वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरे, पक्षी ही सुस्वरें आळविती….” हिरव्या गर्द वृक्षांच्या सानिध्यात राहायला आवडणार नाही असा माणूस दुर्मिळ. म्हणूनच घरांची जाहिरात करताना ‘निसर्गाच्या सान्निध्यात’ असे आवर्जून बिंबवले जाते. आसपास पक्षी, हिरवळ,दाट झाडी असावी असे सगळ्यांनाच वाटते. लहानपणी कोणाला लाडिक रागवायचे झाले तर,” तुझे/त्याचे घरं उन्हात बांधू हं.” असे मोठी माणसे म्हणतं ते...
Continue reading...चांदण्यांचे हात
“चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखया रे आवर ही सावर ही चांदरात…” कायमच आकाशात असुनही चांदण्यांची गंमत रात्रीच असते. चांदण्या म्हणजेच तारे. जशी चांदण्यांची गंमत आहे तशीच तारांकित वलयाची गंमत आहे त्यापेक्षाही आकर्षण आहे. प्रत्येक व्यक्तीला ‘Stardom’ जास्त आकर्षित करते. मग कोणी मालिका, चित्रपट अथवा नाट्यसृष्टीतला एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री असेल तर त्यांना बघण्यासाठी, भेटण्यासाठी, अगदी ...
Continue reading...मराठी अस्मिता
“मराठी असे आमुची मायबोली जरी आज राज्यभाषा नसे…” मराठी भाषेविषयी प्रेम,आदर, आपुलकी असलीच पाहिजे. हो कारण ती मातृभाषा आहे. जन्मभूमी आणि मातृभाषा ही आई इतकीच पूजनीय असायलाच हवी. माणूस आपल्या आईकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा मानतो. मग ती भाषा कोणती हे कळण्याचे त्याचे ते वयही नसते. संवाद साधण्यासाठी भाषेचा जन्म...
Continue reading...
